घरटेक-वेकJio Phone Next ला 'हा' स्मार्टफोन देणार टक्कर; जाणून घ्या किंमत

Jio Phone Next ला ‘हा’ स्मार्टफोन देणार टक्कर; जाणून घ्या किंमत

Subscribe

जिओ ग्राहकांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जिओ फोन नेक्स्ट लाँच झाला असला तरी अद्याप त्याच्या विक्रीबद्दल कोणतीही बातमी समोर आलेली नाही. मात्र Jio Phone Next ला टक्कर देण्यासाठी itel चा नवा स्मार्टफोन सध्या चर्चेत आहे. itel ने भारतात एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे, जो थेट Jio Phone Next सह स्पर्धा करणार आहे. Itel ने भारतात itel A26 लाँच केला असून जो एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे. या फोनला 1.4GHz क्वाड-कोर प्रोसेसर आणि 32GB स्टोरेज देण्यात आले आहे. जाणून घ्या या फोनबद्दल…

Itel A26 या फोनची किंमत 5 हजार 999 रुपये आहे. मात्र सध्या हा फोन फ्लिपकार्टवर 6 हजार 399 रुपयांच्या किंमतीसह विक्रीस आहे. itel A26 डीप ब्लू, ग्रेडेशन ग्रीन आणि लाइट पर्पल रंगात खरेदी करता येणार आहे. फोनसोबत एक वर्षाची वॉरंटी असून 100 दिवसांची वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेंट सुविधा देखील उपलब्ध असणार आहे. Itel A26 मध्ये Android 10 ची गो एडिशन असून याशिवाय याफोनला 5.7-इंच HD + डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 720×1520 पिक्सेल देण्यात आले आहे. फोनमध्ये 1.4GHz प्रोसेसर आहे, ज्याचे मॉडेल आणि नाव कंपनीने दिलेले नाही.

- Advertisement -

या फोनच्या कॅमेरा बद्दल सांगायचे झाले तर यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये प्राइमरी लेन्स 5 मेगापिक्सल आणि दुसरा लेन्स AI सेंसर आहे. फ्रंटला 2 मेगापिक्सेलचा कॅमेरा असून जो सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी असणार आहे. Itel A26 मध्ये कनेक्टिव्हिटी 4G VoLTE, 4G ViLTE, 3G आणि 2G सपोर्ट असेल. फोनमध्ये सोशल टर्बो फीचर आहे, ज्याच्या मदतीने व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्ड करता येतात. या फोनमध्ये 3020mAh ची बॅटरी आहे. याशिवाय विशेष म्हणजे यामध्ये फेस अनलॉक सुविधा देखील आहे.


ब्रिटनने भारतीय कोविशील्डला’ या’ कारणांसाठी मान्यता दिली नव्हती

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -