घरटेक-वेकJeep Compass BS6 भारतात लाँच; जाणून घ्या फिचर्स

Jeep Compass BS6 भारतात लाँच; जाणून घ्या फिचर्स

Subscribe

BS4 मॉडेलच्या तुलनेत Jeep Compass BS6 ची किंमत ८९,००० रुपयांवरून १.३८ लाख रुपयांवर गेली आहे.

अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनी Jeep India (जीप इंडिया) ने आपली SUV (एसयूव्ही) Compass बीएस 6 लाँच केली आहे. Jeep Compass BS6 च्या अधिकृत लाँचिंगसह या एसयूव्हीच्या किंमतींचाही खुलासा करण्यात आला आहे. BS4 मॉडेलच्या तुलनेत Jeep Compass BS6 ची किंमत ८९,००० रुपयांवरून १.३८ लाख रुपयांवर गेली आहे.

इंजिन

Jeep Compass BS6 163 पीएस 1.4-लिटर टर्बो-पेट्रोल आणि 173 पीएस, 2.0-लिटर डिझेल इंजिनसह आली आहे. यात 6-स्पीड मॅन्युअल, 7-स्पीड ड्युअल-क्लच स्वयंचलित आणि 9-स्पीड स्वयंचलित गिअरबॉक्ससारखे पर्याय आहेत.

- Advertisement -

किंमत

Jeep Compass BS6 ची किंमत दिल्लीतील एक्स-शोरूममध्ये १६.४९ लाख रुपये पासून सुरू होते, जी २४.९९ लाख रुपयांवर जाते. म्हणजेच त्याची प्रारंभिक किंमत ८९,०० रुपयांनी वाढली आहे. त्याच वेळी, Jeep Compass BS6 डिझेलची एक्स-शोरूम किंमत १७.९९ लाख रुपये पासून सुरू होते, जी जुन्या BS 4 मॉडेलपेक्षा १.३८ लाख रुपये अधिक आहे.

हे व्हेरिएंट्स बंद

नवीन BS6 इंधन मानकांनुसार इंजिन अपडेट करण्याबरोबरच जीपने आता कंपास एसयूव्हीचे एंट्री-लेव्हल स्पोर्ट (स्पोर्ट) रूप बंद केलं आहे. याव्यतिरिक्त, स्पोर्ट प्लस प्रकार आता बेस व्हेरिएंट बनला आहे. या व्यतिरिक्त कंपनीने Longitude (O) आणि लिमिटेड व्हेरिएंट देखील बंद केले आहेत. तर आता या मॉडेलमध्ये केवळ स्पोर्ट प्लस, Longitude, Longitude plus आणि लिमिटेड प्लस व्हेरिएंट उपलब्ध आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – Motorola Edge आणि Motorola Edge+ आज भारतात लाँच होणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -