घरटेक-वेकReliance Jio ची सर्वात स्वस्त योजना; हाय-स्पीड, अनलिमिटेड डेटा, फ्री कॉलिंगसह 'हे'...

Reliance Jio ची सर्वात स्वस्त योजना; हाय-स्पीड, अनलिमिटेड डेटा, फ्री कॉलिंगसह ‘हे’ आहेत फायदे

Subscribe

भारतीय टेलीकॉम कंपनी रिलायन्स जिओने आपल्या ग्राहकांसाठी बऱ्याच रिचार्ज योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये हाय-स्पीड डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग सुविधा देखील ग्राहकांना देण्यात येत आहे. यामुळेच ग्राहकांना परवडणारी प्रीपेड पॅक निवडणे कठीण झाले आहे. त्यामुळे जिओने ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त प्रीपेड योजना आणल्या आहेत. यामध्ये ग्राहकांना दिवसाला 1 जीबी ते 2 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसह प्रीमियम अ‍ॅप सबस्क्रिप्शन देखील मिळणार आहे.

Jio चा 98 रुपयांची योजना

जिओची ही एक सर्वात स्वस्त प्रीपेड योजना आहे. हे रिचार्ज पॅक 14 दिवसांच्या कालावधी करता असणार आहे. या पॅकमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस ग्राहकांना देण्यात येणार आहे. यासह, युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिली जाणार आहे. या व्यतिरिक्त युजर्सना या प्लानमध्ये Jio टीव्ही, सिनेमा, न्यूज, सिक्योरिटी आणि क्लाऊडची फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

- Advertisement -

Jio चा 149 रुपयांची योजना

जिओची ही प्रीपेड योजना 24 दिवसांच्या वैधतेसह युजर्सना देण्यात येते. या प्रीपेड योजनेत युजर्सना दररोज 1 जीबी डेटा आणि 100 एसएमएस वापरता येणार आहेत. यासह, युजर्सना यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त युजर्सना या प्लानमध्ये Jio टीव्ही, सिनेमा, न्यूज, सिक्योरिटी आणि क्लाऊडची फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

Jio चा 199 रुपयांची योजना

जिओची ही सर्वोत्कृष्ट विक्रेता प्रीपेड योजना आहे. या प्रीपेड योजनेत दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएसची ऑफर दिली जाते. यासह युजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त या प्लानमध्ये Jio टीव्ही, सिनेमा, न्यूज, सिक्योरिटी आणि क्लाऊडची फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.

- Advertisement -

Jio चा 249 रुपयांची योजना

हे जिओचे सुपर व्हॅल्यू पॅक आहे. या रिचार्ज योजनेत ग्राहकांना दिवसाला 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएस युजर्सना उपलब्ध होणार आहे. तसेच, युजर्सना कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग करता येणार आहे. या व्यतिरिक्त या प्लानमध्ये Jio टीव्ही, सिनेमा, न्यूज, सिक्योरिटी आणि क्लाऊडची फ्री सब्सक्रिप्शन मिळणार आहे.  या पॅकची वैधता 28 दिवसांची आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -