घरटेक-वेकReliance Jio युजर्सना झटका! 'हा' प्लान केला बंद; आता मोजावे लागणार इतके...

Reliance Jio युजर्सना झटका! ‘हा’ प्लान केला बंद; आता मोजावे लागणार इतके पैसे?

Subscribe

अलीकडेच रिलायन्स जिओने युजर्सना एक धक्का देत एक मोठा प्लॅन बंद केला आहे. हा प्लॅन JioPhone युजर्समधील एक लोकप्रिय प्लॅन होता. कंपनीने अलीकडेच 749 रुपयांचा प्रीपेड प्लॅन बंद केला. यामुळे युजर्स आता 899 रुपयांचा JioPhone Prepaid Plan खरेदी करावा लागत आहेत. हा प्लॅन 150 रुपयांनी महागला आहे. जिओचा हा प्रीपेड प्लॅन लॉन्ग टर्म प्लॅन घेऊ इच्छिणाऱ्या युजर्ससाठी आहे. या प्लॅनचे बेनिफिट्स आणि दुसऱ्या डिटेल्सची तपशीलवार माहिती घेऊ…

TelecomTalk च्या अहवालानुसार, Reliance Jio आपल्या JioPhone युदर्ससाठी 749 आणि 899 चे दोन प्लॅन ऑफर करत आहे. दोन्ही प्लॅनमध्ये सेम बेनिफिट्स दिले जात होते. पण आता 749 रुपयांचा प्लॅन बंद केल्यानंतर यूजर्सकडे फक्त 899 रुपयांच्या प्लॅनचा पर्याय आहे. यामुळे याला टॅरिफ हाईक म्हणून पाहिजे जात आहे. या प्लॅनच्या माध्यमातून कंपनीने थेट JioPhone चा हा प्लॅन 150 रुपयांनी महाग केला आहे. प्लॅनची​नवीन किंमत कंपनीच्या वेबसाइट किंवा अॅपवर लिस्ट करण्यात आली आहे.

- Advertisement -

JioPhone च्या 899 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनबद्दल बोलायचे झाले तर, यामध्ये यूजर्सना एकूण 24 GB डेटा दिला जातो. युजर्सला दर 28 दिवसांनी 2GB हायस्पीड डेटा दिला जातो. हाय-स्पीड डेटा संपल्यानंतर वेग 64Kbps पर्यंत होतो.

या प्लॅनची वैधता 336 दिवसांची असून यामध्ये युजर्सना 28 दिवसांचे 12 सायकल मिळतात. ज्यामध्ये प्रत्येक सायकलमध्ये 50 SMS आणि 2GB डेटा दिला जातो. याशिवाय जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनसह प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉल्सचा पर्याय मिळतो.


बनावट संदेश, कॉल्सबद्दल एचडीएफसी बँकेने ग्राहकांना केले अलर्ट, संदेश कसे ओळखायचे हे देखील सांगितले

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -