जिओ फायबर ग्राहकांसाठी खुशखबर! Amzone प्राईम व्हिडिओचे सब्सक्रिप्शन मिळणार फ्री!

याबाबतची माहिती अॅमेझॉन प्राईमने देखील ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

jio fiber subscribers get amazon prime video subscriptions absolutely free for one year
जिओ फायबर ग्राहकांसाठी खुशखबर! Amzone प्राईम व्हिडिओचे सब्सक्रिप्शन मिळणार फ्री!

रिलायन्स जिओने आपल्या सर्व जिओ फायबर ग्राहकांना एक वर्षासाठी अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचे फ्री सब्सक्रिप्शन जाहीर केलं आहे. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, असं जिओने स्पष्टपणे सांगितलं आहे. जिओ फायबरच्या गोल्ड, डायमंड, प्लॅटिनम आणि टायटॅनियम प्लॅनच्या ग्राहकांना अॅमेझॉन प्राईम व्हिडिओचे सब्सक्रिप्शन फ्रीमध्ये मिळणार आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओनेही ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली आहे.

नुकताच अमिताभ बच्चन आणि आयुष्मान खुरानाचा यांचा ‘गुलाबो सीताबो’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित झाला आहे. यानंतर अनेक चित्रपट अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहेत. पण याबाबत सिनेमागृहांच्या मालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी प्रसिद्धीपत्रक जाहीर करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.

सिनेमागृहांच्या मालकांची नाराजीचा विचार करता, आता निर्मात्यांच्या बचावासाठी ‘दी प्रोड्यूसर गिल्ड ऑफ इंडिया’ संघटना मैदान उतरली आहे. सिनेमागृहांच्या मालकांच्या नाराजीबद्दल गिल्डने म्हटले की, त्यांच हे सर्व दुर्दैवी आहे. त्यांच्या सहकार्यांकडून संतापाची भावना व्यक्त आहे.

गिल्डने सिनेमागृहांच्या मालकांना सांगितलं आहे की, अशी अशी वेळ आहे की जेव्हा रखडलेल्या चित्रपटांचे निर्माते आणि पूर्ण शूट झालेल्या चित्रपटांचे निर्माते दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान सहन करत आहे. लॉकडाऊनमुळे चित्रपटांचे शूटिंग पुन्हा कधी सुरू होईल याबाबत काहीच माहित नाही?


हेही वाचा – Amazonने ‘स्कूल फ्रॉम होम’ स्टोअर भारतात केलं सुरू