घरटेक-वेकJioचा नवा प्लॅन लाँच; आता ३० दिवसांपर्यंत रोज मिळणार 1.5GB डेटा अन्...

Jioचा नवा प्लॅन लाँच; आता ३० दिवसांपर्यंत रोज मिळणार 1.5GB डेटा अन् फ्री कॉलिंग

Subscribe

रिलायन्स जिओ (Reliance Jio)ने एक नवा प्रीपेड प्लॅन जारी केला आहे. हा प्लॅन जर तुम्ही 5 एप्रिलला घेतला तर तो 5 मे ला रिन्यू होईल. जिओने हा प्लॅन 259 रुपयात जारी केला आहे. यामध्ये ग्राहकाला प्रत्येक दिवसाला १.५जीबी (1.5GB) डेटा आणि फ्री कॉलिंग सुविधासोबत बरेच काही फायदे होतील.

सध्या 28 दिवसांचे वैधता असलेले प्रीपेड प्लॅन ग्राहकांना दिले जात आहेत. परंतु जिओचा हा प्रीपेड प्लॅन इतर प्लॅनप्रमाणे नसून पूर्ण महिन्यासाठी असणार आहे. जिओकडून सांगण्यात आले आहे की, ‘हा रिचार्ज महिन्याला एक तारखेला पुन्हा केला जाऊ शकतो. तसेच या रिचार्जचा एका वेळेला अनेकदा वापर करू शकता. म्हणजेच एका वेळेला तुम्ही चारदा रिचार्ज करता तर प्रत्येक महिन्याला तो रिन्यू होत राहिल.’

- Advertisement -

या प्लॅनमध्ये प्रतिदिन 1.5GB डेटा व्यतिरिक्त प्रति दिन 100 SMS, अनलिमिटेड वॉईस कॉल आणि JIO अॅपचा कॉम्प्लिमेंट्री सब्सक्रिप्शन दिले जाईल. एका दिवसापूर्वी जिओने क्रिकेट पॅक जो केला होता, ज्यामध्ये 555 रुपयात डिज्नी प्लस हॉटस्टारचे सब्सक्रिप्शनसोबत 2GB डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंगसोबत जिओ अॅप्स सब्सक्रिप्शन दिले जात आहे. ज्यामध्ये 56 दिवसांची वैधता दिली गेली आहे.

जिओच्या इतर काही प्रीपेड रिचार्जबद्दल बोलायचे झाले तर 1.5GB प्रत्येक दिवसाला देत असेल तर त्यामध्ये 119 रुपयांचा रिचार्ज प्लॅन 14 दिवसांचा वैधतेसोबत येतो. तसेच 199 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनला 23 दिवसांची वैधता असते आणि 239 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1.5GB दर दिवसाला डेटासोबत 28 दिवसांची वैधता मिळते.

- Advertisement -

आता जिओने दरात सुधारणा करत 30 दिवसांच्या म्हणजे पूर्ण महिन्यासाठी 259 रुपयांचा प्लॅन लाँच केला आहे. या सर्वांमध्ये जिओ अॅप्स सब्सक्रिप्शन, 1.5GB अनलिमिटेड प्रत्येक दिवसाला डेटा आणि फ्री कॉलिंगची सुविधा मिळत आहे. हे सर्व प्लॅन 300 रुपयांच्या आत येतात.


हेही वाचा – Aadhaar Card वर मोबाईल नंबर अपडेट करायचाय? मग फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -