घरटेक-वेकमोदींनी कौतुक केलेलं Twitter सारखं स्वदेशी Koo App, नेमकं आहे तरी कसं?

मोदींनी कौतुक केलेलं Twitter सारखं स्वदेशी Koo App, नेमकं आहे तरी कसं?

Subscribe

आजकाल भारतात ‘मेक इन इंडिया’वर जास्त लक्ष केंद्रीत केले जात आहे. अशा परिस्थितीत भारतीय तरुणांना लोकप्रिय Appsचे पर्यायी Apps तयार करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. हे लक्षात घेता नुकतेच भारतीय अनेक Apps लाँच झाले आहेत. असाच एक कू (Koo) App आहे. ज्याला लोकप्रिय मायक्रो-ब्लॉगिंग साईट ट्विटरचे पर्यायी आणि भारतीय व्हर्जन म्हटले जात आहे.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात ‘मेक इन इंडिया Apps’चे कौतुक केले. पंतप्रधानांनी कौतुक केलेल्या Appsपैकी एक म्हणजे कू App. या appने सोशल मीडिया कॅटेगरीमध्ये यश प्राप्त केले आहे.

- Advertisement -

कू Appबद्दल माहिती…

मार्चमध्ये अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावतका यांनी हा App विकसित केला होता. ट्विटरसारखा हा एक App आहे. जेथे युजर्स आपले विचार आणि मते व्यक्त करू शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा App कन्नड आणि हिंदी सारख्या बऱ्याच भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे. लवकरच हा App तेलगू, बंगाली, तामिळ, मल्याळम, गुजराती, मराठी, पंजाबी, उडिया आणि आसामी या भाषेत येणार आहे. या Appमध्ये युजर्स आपल्या पसंतीच्या भाषेत स्वतःला व्यक्त करू शकतात.

तसेच ट्विटरप्रमाणे या appमध्ये युजर्स इतर लोकांना फॉलो करू शकतात आणि फोटो, ऑडिओ, मजकूर आणि व्हिडिओ फॉर्मेटमध्ये पोस्ट शेअर करू शकतात. यामध्ये दुसऱ्यांसोबत चॅट करू शकता. तसेच Appच्या माध्यमातून युजर्स सेलिब्रिटी, न्यूज चॅनेल, पत्रकार आणि बऱ्याच मोठ्या व्यक्तींना फॉलो करू शकता. काही महत्त्वाचे लोक या Appचा एक भाग आहेत. यामध्ये केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद, कर्नाटकचे उपमुख्यमंत्री, पोलीस उपायुक्त, अनिल कुंबळे आणि जवागल श्रीनाथ यांचा समावेश आहे. हा App अँड्रॉइड आणि आयओएस दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध आहे. Google Play Store वरून १ मिलियन हून अधिक लोकांनी हा App डाऊनलोड केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Vodafone Idea ने दोन नवे प्रीपेड प्लॅन केले लाँच, जाणून घ्या त्याचे फायदे


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -