Samsung चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत

launch samsung galaxy m01 core most affordable smartphone launched in india
Samsung चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत

दक्षिण कोरियाची स्मार्टफोन कंपनी सॅमसंग (Samsung)ने आपला स्वस्त स्मार्टफोन Galaxy M01 Core भारतात लाँच केला आहे. मेक इन इंडिया (Make in India) कॉन्सेप्टवर तयार केलेला हा स्मार्टफोन Galaxy M सीरिजचा सर्वात स्वस्त डिव्हाइस आहे. या स्मार्टफोनला 1GB RAM + 16GB आणि 2GB RAM + 32GB या दोन स्टोरेज ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आले आहे.

Galaxy M01 Core ची थेट स्पर्धा Realme C11 शी आहे. Realme C11 हा स्मार्टफोन गेल्या दोन दिवसांपूर्वीच 2GB RAM + 32GB स्टोरेजच्या ऑप्शनसह लाँच केला आहे. भारतात लाँच झालेला हा स्मार्टफोन Samsung Galaxy M सीरिजचा स्मार्टफोन आहे. कंपनी येत्या काही दिवसांत Galaxy M31s सीरिजचा आणखी एक डिव्हाइस लाँच करणार आहे. हा 6,000mAh बॅटरी आणि 48MP क्वाड रियर कॅमेरा फिचरसोबत लाँच केला जाईल.

Galaxy M01 Core फिचर्स

सॅमसंगचा हा सर्वात परवडणारा स्मार्टफोन देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने विकला जाईल. हा फोन ५.३ इंचाचा HD प्लस डिस्प्लेसह लाँच करण्यात आला आहे. त्याच्या बेस मॉडेलची किंमत ५ हजार ४९९ रुपये आहे. तथापि, त्याच्या 2GB RAM + 32GB व्हेरिएंटची किंमत ६ हजार ४९९ रुपये आहे. हा फोन ब्लॅक, ब्लू आणि रेड अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. या स्मार्टफोनची किंमत Vivo TWS Neo इअरबड्सपेक्षा कमी आहे, हे ५ हजार ९९९ रुपयांच्या किंमतीवर येते.

हा फोन MediaTek MT6739 चिपसेट प्रोसेसरवर काम करतो. हा फोन अँड्रॉइड गो प्लॅटफॉर्मवर चालतो. शिवाय फोनमध्ये पॉवर देण्यासाठी 3,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. फोन ड्यूल 4G SIM कार्ड सपोर्ट सोबत आहे. हा फोन खास करून OneUI सोबत डार्क मोडला इंटिग्रेट केले आहे. तसेच फोनमध्ये इंटेलिजेंट फोटोज फीचर दिले गेले आहे. जेणेकरून ड्युप्लीकेट फोटोज डिलीट होऊन फोन मेमरी फ्री होईल. फोनच्या बॅकला 8MP कॅमेरा दिला गेला आहे. तर फ्रंटला 5MP कॅमेरा दिला गेला आहे.


हेही वाचा – Oppo A72 5G पावरफूल प्रोसेसरसह लाँच, जाणून घ्या किंमत आणि जबरदस्त…