घरटेक-वेकतब्बल 7,000mAh बॅटरीचा Samsung Galaxy M51 भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत

तब्बल 7,000mAh बॅटरीचा Samsung Galaxy M51 भारतात झाला लाँच, जाणून घ्या किंमत

Subscribe

भारतीय ग्राहक सॅमसंग गॅलेक्सी एम५१ (Samsung Galaxy M51) बरीच प्रतीक्षा करत होते आणि आता कंपनीने ग्राहकांच्या प्रतीक्षेवर पूर्णविराम लावला असून हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची खासियत त्यात देण्यात आलेली 7,000mAh बॅटरी आहे, जी ११५ मिनिटे ० ते १०० टक्के चार्ज केली जाऊ शकते. या व्यतिरिक्त स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. भारता अगोदर सॅमसंग गॅलेक्सी एम५१ जर्मनीत लाँच करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एम५१ किंमत आणि उपलब्धता

भारतातील बाजारात सॅमसंग गॅलेक्सी एम५१ दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच केला आहे. यामध्ये 6GB + 128GB स्टोरेज मॉडलची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहेत. तर 8GB + 128GB मॉडलची किंमत २६ हजार ९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन १८ सप्टेंबरला दुपारी १२ वाजता पहिल्यांदा सेलसाठी उपलब्ध केला जाईल. तसेच हा स्मार्टफोन कंपनीच्या अधिकृत बेवसाईट आणि Amazonच्या माध्यमातून खरेदी केला जाऊ शकतो. शिवाय ऑफलाईन स्टोर्समध्येही उपलब्ध असेल. हा स्मार्टफोन इलेक्ट्रिक ब्लू आणि ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध असेल.

- Advertisement -

सॅमसंग गॅलेक्सी एम५१ सोबत मिळतील विशेष ऑफर

हा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी एसडीएफसी बँकच्या क्रेडिट कार्ड वापर करणार असला तर तुम्हाला २ हजार रुपये सूट मिळेल. परंतु ही ऑफर फक्त Amazonवर उपलब्ध असेल.

सॅमसंग गॅलेक्सी एम५१चे फिचर्स

सॅमसंग गॅलेक्सी एम५१ मध्ये सर्वात महत्त्वाचे फिचर म्हणजे याची बॅटरी. यामध्ये असलेली 7,000mAhची बॅटरी जी 25W फास्ट चार्जिंगसह येते. या स्मार्टफोनमध्ये वापरण्यात आलेली बॅटरी ११५ मिनिटांत ० ते १०० टक्के चार्ज होऊ शकते, असा कंपनीने दावा केला आहे. अँड्रॉइड १० ओएसवर आधारित हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 730G प्रोसेसरवर काम करतो आणि यामध्ये ६.७ इंचचा फुल एचडी+सुपर एमोलेड डिस्प्ले दिला गेला आहे. ज्यामध्ये प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ३चा वापर केला आहे.

- Advertisement -

सॅमसंग गॅलेक्सी एम५१ क्वाड रियर कॅमेरा सेटअप आहे. याचे प्रायमरी सेंसर 64MPचा आहे. तर 12MPचा अल्ट्राल वाइड सेंसर, 5MP मॅक्रो सेंसर आणि 5MPचा डेप्थ सेंसर दिला गेला आहे. व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी या स्मार्टफोन 32MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -