Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक दमदार बॅटरी आणि फिचर्ससह Lava Benco V80 स्मार्टफोन लाँच, इतकी आहे किंमत

दमदार बॅटरी आणि फिचर्ससह Lava Benco V80 स्मार्टफोन लाँच, इतकी आहे किंमत

Related Story

- Advertisement -

दमदार बॅटरी आणि फिचर्ससह लावा (Lava) आणि बेंको मोबाईल (Benco Mobile)ने Lava Benco V80 स्मार्टफोन लाँच केला आहे. थायलँडमध्ये लाँच झालेला Lava Benco V80 स्मार्टफोनचे 64GB पर्यंत स्टोरेज आहे. स्मार्टफोनच्या सिक्युरिटीसाठी रियर-फेसिंग, फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेस अनलॉक सपोर्ट दिला गेला आहे. Lava Benco V80 या स्मार्टफोनचे वजन २०० ग्रॅमपेक्षा कमी आहे.

किंमत

- Advertisement -

थायलँटमध्ये Lava Benco V80 या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत २,८९० बात (Baht) आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार या स्मार्टफोनची किंमत ६ हजार ३०० रुपये आहे. Lava Benco V80 स्मार्टफोन साएन ब्लू आणि ग्रीनिश सिल्वर कलर ऑप्शममध्ये आहे. या स्मार्टफोनचे वजन १९५.७ ग्रॅम आहे. स्मार्टफोनमध्ये ६.५१ इंचचा IPS डिस्प्ले दिला गेला आहे, जो HD+ रेझोल्यूशनला सपोर्ट करतो. शिवाय ऑस्पेक्ट रेशिओ 20:9 आहे. तसेच स्मार्टफोनची स्क्रीन-टू-बॉडी रेशिया 89.5 टक्के आहे.

फिचर्स

- Advertisement -

Lava Benco V80 स्मार्टफोनमध्ये ट्रिपलड्रॉप नॉच दिला गेला आहे, ज्यामध्ये ८ मेगापिक्सल AI फ्रंट-फेसिंग कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. स्मार्टफोनच्या बॅकमध्ये LED फ्लॅशसह ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. ज्यामध्ये पोर्ट्रेट मोड आणि AI सीन रिकॉग्निशनसारखे फोटोग्राफी फिचर्स दिले गेले आहे. हा स्मार्टफोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो आणि यामध्ये 64GB पर्यंत इंटरनल स्टोरेज आहे. मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून फोनचे स्टोरेज वाढवू शकता.

या स्मार्टफोनमध्ये Unisoc SC9863 क्वॉड-कोर प्रोसेसर दिला आहे. तसेच हा स्मार्टफोन 4GB पर्यंत रॅमसह देतो. स्मार्टफोनमध्ये 5,000 mAh बॅटरी दिली गेली आहे, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते. स्मार्टफोनमध्ये ड्यूल सिम सपोर्ट, 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ, GPS आणि मायक्रोयूएसबीसारखे फिचर्स देण्यात आले आहे.

- Advertisement -