घरटेक-वेकLAVA कंपनीची खास ऑफर!1 रुपयांत मिळणार वायरलेस ईयरबड्स,वाचा सविस्तर

LAVA कंपनीची खास ऑफर!1 रुपयांत मिळणार वायरलेस ईयरबड्स,वाचा सविस्तर

Subscribe

आनंदाची बाब म्हणजे हे इयरबड्स Lava E-Store,Amazone,Flipkart या शॉपिंग साइड वरुन केवळ 1 रुपयांत खरेदी करता येणार आहे

जीवन हे संगिता प्रमाणे आहे.प्रत्येकाच्या आयुष्यात उतार चढावादरम्यान कोणत्या ना कोणत्या गाण्याची आठवण नक्कीच येते. ज्या व्यक्तीला संगित आवडत नाही असा भुतलावर कोणताही मनुष्यप्राणी आजवर जन्माला आला नसेल. आज 21 जून म्हणजेच जागतीक संगित दिवस (World Music Day) आहे. आणि याच खास दिवसाचे अवचित्त साधून ग्राहकांचे जीवन संगितमय करण्यासाठी भारतीय मोबाईल कंपनी लावानं (LAVA) True Virles Segment मध्ये पदार्पण करत आपला पहिला- वहिला प्रोटक्ट Lava Probuds लाँन्च केला आहे. आणि ग्राहकांसाठी आनंदाची बाब म्हणजे हे इयरबड्स Lava E-Store,Amazone,Flipkart या शॉपिंग साइड वरुन केवळ 1 रुपयांत खरेदी करता येणार आहे. 24 जून रोजी दुपारी 12 वाजता हीऑफर ग्राहकांसाठी स्टॉक संपेपर्यंत सुरु राहणार असल्याचे बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lava Mobiles (@lava_mobiles)

- Advertisement -

लावा कंपनीतर्फे प्रोबड्समध्ये 11.6mm अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर्स मीडियाटेक Airoha चिपसेट दिला आहे. तसेच हे इयरबड्स दिसायला साइझमध्ये लहानवाटत असले तरी याचा Bass सोबत पॉवरफुल साऊंडचा अनुभव तुम्ही घेऊ शकतात. यामध्ये 55mAh क्षमतेची बॅटरी पॉवर देण्यात आली आहे. याशिवाय याच्या केसमध्ये 500mAh क्षमतेची बॅटरीची साठवू शकतात. इतकच नाही तर म्युझिकप्रेंमीना सलग 25 तास म्युझिक ऐकता येऊ शकतं अशी खात्री कंपनीने दिली आहे. लावाचे हे नवे इयरबड्स वेक अँड पेअर तंत्रज्ञानावर आधारित आहेत. चार्जिंग केस उघडल्यानंतर इयरबड्सला पॉवर मिळते आणि कनेक्ट होण्यासाठी ते तयार होतात. यामध्ये Bluetooth v5.0 कनेक्टिव्हीटी आणि म्युझिक कंट्रोलचं फीचरही मिळतं. हे इयरबड्स IPX5 वॉटर आणि स्वेट रेजिस्टेंट आहेत. या इयरबड्ससोबत वॉईस असिस्टंटचही फीचर मिळतं. या प्रोडक्टसह एका वर्षाची वॉरंटी देण्यात येत असून इट्रोडक्टरी ऑफर नंतर Lava Probud साठी 2,199 रूपये खर्च करावे लागतील..


हे हि वाचा – लवकरच Vivo V21e 5G होणार लाँच; जाणून घ्या याचे जबरदस्त फिचर्स

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -