तीन नवीन iPhone ! किंमतही कमी

उपलब्ध माहितीनुसार या वर्षाअखेरीपर्यंत टप्प्याटप्याने हे तिनही iPhone लाँच केले जाणार आहेत.

new 3 iPhones
सौजन्य- MensXP

यंदाच्या वर्षी Apple कंपनी तीन नवीन iPhone लाँच करणार असल्याची गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा होती. आयफोन युजर्समध्ये याविषयी खूपच उत्सुकता होती. जगभरातील आयफोनप्रेमी या फोन्सची वाट पाहत असताना, नुकतीच Apple कंपनीकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. iPhone XS, iPhone 9 आणि iPhone XS Plus असे तीन नवीन आयफोन लवकरच लाँच करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे या तिनही फोन्सची किंमत सध्याच्या आयफोन्सपेक्षा कमी असल्याचं बोललं जात आहे. उपलब्ध माहितीनुसार या वर्षाअखेरीपर्यंत टप्प्याटप्याने हे तिनही iPhone लाँच केले जाणार आहेत. दरम्यान सोशल मीडियावर या तिनही आयफोनचे फोटो आणि त्यासंदर्भातील काही व्हिडीओ व्हायरल होत आहेत.

व्हिडिओ सौजन्य: युट्यूब

फोन्सची वैशिष्ट्यं / अंदाजे किंमत

टेक्नॉलॉजी क्षेत्रातील एका खासगी वेबसाईटने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार –

iPhone 9 – 6.1 इंचाच LCD डिस्प्ले / 41 हजार ते 48 हजार रुपये

iPhone XS – 5.8 इंचाचा OLED डिस्प्ले / 48 हजार ते 54 हजार रुपये

iPhone XS Plus –  6.5 इंचाचा OLED डिस्प्ले / 68 हजार रुपये

new 3 iPhones
फोटो सौजन्य- युट्यूब

याशिवाय उपलब्ध माहितीनुसाप तिन्ही फोन्सना वायरलेस चार्जिंगचा पर्याय देण्यात आला आहे. तसंच फोनच्या बॅक पॅनलला ग्लास बॉडी बसवण्यात आली आहे. याशिवाय तिन्ही फोन्समध्ये ड्युअर रिअर कॅमेरा बसवण्यात आला आहे.