घरटेक-वेकLIC ने लाँच केले 'शगुन' गिफ्ट कार्ड , १० हजार रुपयांपर्यंत करता...

LIC ने लाँच केले ‘शगुन’ गिफ्ट कार्ड , १० हजार रुपयांपर्यंत करता येणार शॉपिंग

Subscribe

या कार्डचा उपयोग ऑनलाइन वस्तू खरेदी करण्यापासून बिले भरण्यासाठीही केला जाऊ शकतो.

LICने त्यांच्या ग्राहकांसाठी नवीन ऑफर आणली आहे. LIC कार्ड सर्व्हिस लिमिटेड ने रुपे प्लॅटफॉर्मवर IDBI बँकेच्या सहयोगाने ‘शगुन’ कॉन्टेक्टलेस प्रीपेड गीफ्ट कार्ड लाँच केले आहे. LIC CSL कार्डाच्या माध्यमातून ५०० रुपयांपासून १० हजार रुपयांपर्यंत कोणत्याही किंमतीचे गीफ्ट देण्यात येणार आहे. या ‘शगुन’ गिफ्ट कार्डचा वापर ३ वर्षे करता येणार आहे. यात ग्राहक एकाहून अधिक व्यवहार करु शकणार आहेत. या कार्डचा उपयोग ऑनलाइन वस्तू खरेदी करण्यापासून बिले भरण्यासाठीही केला जाऊ शकतो. गिफ्ट देण्यासाठी कॅश लेस पद्धतीच्या वापराला चालना देण्यासाठी LIC CSLची घोषणा करण्यात आल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. (LIC launches gift card ‘Shagun’, shopping up to Rs 10,000)

शगुन कार्डची सुरुवात पहिल्यांदा अधिकारिक उपयोगासाठी LIC आणि त्यांच्या सहाय्यक कंपनीसाठी उपलब्ध होणार आहे. या कार्डचा उपयोग आधिकारिक सम्मेलन आणि समारंभाच्या खास पुरस्कारांची सुविधा करण्यासाठी केला जाणार आहे. त्यानंतर एका डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून हे कार्ड इतर लोकांच्या वापरासाठी आणण्यात येणार आहे.

- Advertisement -

शगुन गिफ्ट कार्डचा उपयोग भारतात लाखो मर्चंट आउटलेट्स आणि ई-कॉमर्स वेबसाइट वर कार्डवर पैसे खर्च करणाऱ्या पर्यायात विविधता आणण्यासाठी करण्यात येणार आहे. डिपार्टमेंटल स्टोअर्स, पेट्रोल पंप, ज्वेलरी स्टोर यासारख्या विविध व्यापाराच्या ठिकाणी या कार्डचा उपयोग करण्याचे स्वातंत्र ग्राहकांना देण्यात येईल असे, कंपनीने म्हटले आहे. या कार्डचा उपयोग करुन विविध वॉलेट आणि ई कॉमर्स पोर्टल किंवा अँपच्या माध्यमातून ऑनलाईन खरेदी,युटिलीटी बिल भरणे,बस किंवा ट्रेनचे तिकीटही बुक करता येणार आहे.


हेही वाचा – 7000mAh बॅटरी, 64MP कॅमरा असणारा Samsung F62 स्वस्त; Flipkart ची विशेष ऑफऱ

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -