घरटेक-वेकToyotaची भन्नाट ऑफर! मका, सोयाबीन द्या आलिशान Fortuner न्या

Toyotaची भन्नाट ऑफर! मका, सोयाबीन द्या आलिशान Fortuner न्या

Subscribe

योजनेत टोयोटा मॉडेल हिलक्स पिकअप ट्रक, कोरोनला क्रॉस एसयूवी किंवा SW4 एसवी कार खरेदी करता येणार आहे.

जपानची ऑटो कंपनी Toyota Motorsने दक्षिण अमेरिकेतील  एक भन्नाट ऑफर आणली आहे. कंपनीने अशी पेमेंट सिस्टम सुरू केली आहे ज्यात लोक कार्ड किंवा कॅश नाही तर मका आणि सोयाबीन देऊन आलिशान फॉरर्च्युनर कार (toyota fortuner)  खरेदी करू शकतात. (Luxurious toyota fortuner can be bought with corn, soybeans) Toyotaच्या ब्राझील ऑपरेशनने पेमेंट करण्यासाठी ही अनोखी सिस्टीम सुरू केली आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांमध्ये आपला खप वाढवण्यासाठी कंपनीने ही अनोखी शक्कल लढवली आहे. टोयोटा ब्राझीलने या योजनेला टोयोटा बार्टर असे नाव दिले आहे. एक कार विकत घेण्यासाठी किती मका आणि सोयाबीय द्यावे लागतील जाणून घ्या.

- Advertisement -

मोटर १ च्या अहवालानुसार, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना मका आणि सोयबीन कारच्या किंमतीच्या बरोबरीने द्यावे लागणार आहे. या योजनेत टोयोटा मॉडेल हिलक्स पिकअप ट्रक, कोरोनला क्रॉस एसयूवी किंवा SW4 एसवी कार खरेदी करता येणार आहे. SW4 म्हणजेच भारतातील Toyota Fortuner. कारची विक्री करण्याआधी टोयोटा कंपनी ग्राहकांच्या ग्रामीम प्रोडक्शनचे सर्टीफिकेट तपासून पाहणार आहे. त्याचप्रमाणे कंपनी ग्राहकांच्या कृषी प्रोडक्टची क्वालिटी देखील चेक करणार आहे.

ही योजना पहिल्यांदा २०१९मध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून सादर करण्यात आली होती. ही योजना पुढील काळात ब्राझीलच्या काही निवडक राज्यांमध्ये उपलब्ध होणार आहे. ज्यात बाहिया, गोइआस, माटो ग्रोसो,मिनस गेरैस, पियाउई आणि टोकैटिन्स या राज्यांचा समावेश आहे. येत्या काळात कंपनी ही योजना संपूर्ण देशात आणण्याचा विचार करत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IDBI बँकेत बंपर भरती! सुरुवातीला मिळणार २९ हजार रुपये पगार, असे करा अप्लाय

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -