घरटेक-वेकतुमच्या मोबाईल फोनमधल्या कॅम स्कॅनरमध्ये व्हायरस आहे!

तुमच्या मोबाईल फोनमधल्या कॅम स्कॅनरमध्ये व्हायरस आहे!

Subscribe

आपल्या मोबाईलमधल्या कॅमस्कॅनर या अॅप्लिकेशनला व्हायरसनं पछाडलं असून त्यातून तुमची माहिती लीक होण्याची शक्यता आहे असा दावा कास्परस्काय या अँटिव्हायरस कंपनीने केला आहे.

पूर्वी कागदपत्र स्कॅन करण्यासाठी आपल्याला बाहेर दुकानात जावं लागायचं. पण आता आपल्या मोबाईलमध्येच अँड्रॉईड फोनमध्येच स्कॅनर उपलब्ध झाला आहे. स्कॅनिंगचे अनेक अॅप्लिकेशन्स उपलब्ध झाले आहेत. त्यातलंच एक अॅप्लिकेशन म्हणजे कॅम स्कॅनर. मात्र, याच कॅम स्कॅनरमध्ये व्हायरस घुसल्याचं समोर आलं आहे. कास्परस्काय या अँटिव्हायरस बनवणाऱ्या कंपनीने यासंदर्भात केलेल्या एका अभ्यासामध्ये हा प्रकार समोर आला आहे. गेल्या दशकभरापासून हे अॅप्लिकेशन मोबाईल युजर्सला सेवा देत असून आत्तापर्यंत १० कोटी मोबाईल युजर्सनी हे अॅप्लिकेशन डाऊनलोड केलं आहे. मात्र, या नव्या व्हायरसमुळे युजर्समध्ये गोंधळ आणि भिती निर्माण झाली आहे. जून आणि जुलैदरम्यान आलेल्या कॅमस्कॅनरच्या अपडेट्समधून हा व्हायरस शिरल्याचं समोर आलं आहे. या दरम्यान कंपनीने अॅप्लिकेशनमध्ये नवीन अॅड मॉड्यूल आणलं होतं. त्यातूनच हा व्हायरस लागल्याचं सांगितलं जात आहे.

हा व्हायरस काय करतो?

तुमच्या मोबाईलमध्ये एकदा हा व्हायरस शिरला, की तो स्वत:च त्याच्यासोबत इतरही व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करतो. त्याशिवाय कॅमस्कॅनरवर चालणाऱ्या जाहिराती हा व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये सगळीकडे दाखवायला लागतो. शिवाय, काही प्रकरणांत तर हा व्हायरस मोबाईल युजर्सला देखील न विचारता ऑनलाईन सशुल्क असणाऱ्या सेवांसाठी रजिस्ट्रेशन करून टाकतो! त्यामुळे मोबाईल युजर्सला आर्थिक भुर्दंड पडतो तो वेगळाच.

- Advertisement -

कॅमस्कॅनरनं केला खुलासा

दरम्यान, कास्परस्कायने याबाबतचा ब्लॉग अपलोड केल्यापासून गुगलने प्ले स्टोअरवरून कॅम स्कॅनर अॅप्लिकेशनच काढून टाकलं आहे. नव्या अॅड मोड्यूलमुळे हे प्रकार होत असल्याचं कॅम स्कॅनरनं मान्य केलं असलं, तरी अॅप्लिकेशनमध्ये कोणताही व्हायरस सापडला नसल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. तसेच, नुकतंच कंपनीनं यामध्ये सुधारणा केली असून मोबाईल युजर्स त्यांच्या मोबाईलमधलं अॅप्लिकेशन अपडेट करू शकतात. असं ट्वीट कॅमस्कॅनरनं केलं आहे. आयफोन युजर्सना याचा फटका बसलेला नसल्याचं देखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

- Advertisement -

गुगल प्ले स्टोअरचा अजूनही रेड सिग्नल

कॅमस्कॅनरनं जरी उपाययोजना केल्या असल्या, तरी गुगलनं अद्यापपर्यंत हे अॅप्लिकेशन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून द्यायला ग्रीन सिग्नल दिला नसल्यामुळे अजूनही कॅमस्कॅनरपुढच्या अडचणी कायम आहेत. त्यामुळे या मोबाईल अॅप्लिकेशनपासून काही काळ लांबच राहिलेलं बरं!


हेही वाचा – एसरचे आठ नवीन गेमिंग लॅपटॉप!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -