घरटेक-वेकभारतात १३ वीवीआयपी आयफोनवर मालवेअर हल्ला

भारतात १३ वीवीआयपी आयफोनवर मालवेअर हल्ला

Subscribe

भारतात १३ वीवीआयपी आयफोनवर मालवेयर हल्ला करण्यात आला आहें.

भारतात १३ वीवीआयपी आयफोनवर मालवेअर हल्ला करण्यात आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर या मालवेअरच्या माध्यमातून वीवीआयपी आयफोनमधील मॅसेजेस, व्हाट्सअॅप लोकेशन, चॅट लॉग, फोटोज आणि कॉन्टॅक्ट्स चोरले गेल्याची माहिती समोर येत आहे. ‘कॉमर्शियल थ्रेट इंटेलिजन्स ग्रुप सिस्को टूल्स’च्या शोधकर्ते आणि विश्लेषकांनी हा एक मोठा हल्ला असल्याचे सांगितले आहे. आतापर्यंत देशात १३ वापरकर्त्यांची माहिती या हल्ल्यामुळं चोरीला गेली आहे. परंतु, प्रशासनाकडून या १३ लोकांची नावे सांगण्यात आलेली नाहीत.

रशियाच्या ई-मेल डोमेनचा वापर

हल्ला करणाऱ्या व्यक्तीचे ई-मेल डोमेन रशियाचे असल्याचे समोर येत आहे. मात्र, सिस्कोच्या संशोधकांनुसार हल्ला करणारा भारतातच असून तो चकवण्यासाठी रशियाच्या ई-मेल डोमेनचा वापर करत आहे. या विरोधात सुरु असलेल्या कारवाईत हल्ला करणाऱ्याच्या दोन पर्सनल डिव्हाईसमध्ये वोडाफोन नेटवर्कचा वापर केला गेला असल्याचे समोर आले आहे. ‘टालोस इंटेलेजन्सी ब्लॉग’मध्ये लिहिले आहे की, हल्लेखोराने १३ आयफोनच्या अॅक्सेससाठी ओपन सोर्स मोबाईल डिव्हाईस मॅनेजमेंट सिस्टीम तयार केली आहे.

- Advertisement -

नियोजन करुन केला हल्ला

‘लायनेक्स/युनिक्स सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशनच्या कम्युनिस्ट निक्सक्रॉफ्ट टालोज’च्या रिसर्चनुसार हा प्रकार पूर्णपणे नियोजन करुन केला असल्याचे समोर आले आहे. हल्लेखोर या हल्ल्यासाठी तीन वर्षापासून नियोजन करत असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, याबाबतीत कुणालाही माहिती मिळू शकली नाही. शिवाय, हल्लेखोराने भारतातील फक्त १३ आयफोनवर हा हल्ला केला आहे. त्यामुळे वेळेअगोदर या हल्लेखोराची माहिती मिळवणे तितकेच महत्वाचे आहे.

आयओएस डिव्हाईस असुरक्षित

‘या हल्ल्यातून आयओएस डिव्हाईस असुरक्षित असल्याचं स्पष्ट होत आहे. बरेच वापरकर्ते याबाबतीत अज्ञात आहेत’ असं सिक्युरिटी रिसर्चर किरण जोनलगड्डा यांनी सांगितले. तर, ‘आयफोनची सुरक्षेत कमतरता असल्याचे अजून समोर आलेले नाही. जर असे झालेही असेल तर यात वापरकर्त्याची चूक असू शकते’ असं तेलंगणाच्या सीआयडी सुप्रीटेंडंट ऑफ पोलीस यु. राममोहन यांनी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -