घरटेक-वेकदिवाळी धमाका! Maruti,audi, volkswagen कंपनीच्या येणार ४ नव्या गाड्या, जाणून घ्या डिटेल्स

दिवाळी धमाका! Maruti,audi, volkswagen कंपनीच्या येणार ४ नव्या गाड्या, जाणून घ्या डिटेल्स

Subscribe

ढील महिन्यात लाँच होणाऱ्या जबरदस्त गाड्यांमध्ये news generation maruti suxuki celerio आणि Tata Tiago CNG त्याचप्रमाणे New Audi Q5 आणि New Volkswagen Tiguan या गाड्यांचा समावेश

दिवळी म्हटले की नवीन वस्तू खरेदी करणे आलेच. दिवाळीच्या मुहूर्तावर भारतातील मोठ्या कार कंपन्या आपल्या स्पेशल गाड्या लाँच करणार आहेत. दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली असल्याने या दिवसात कार खरेदी करणार असाल मारुती,ऑडी आणि फॉक्सवॅगन कंपनी आपल्या स्पेशल गाड्या ग्राहकांसाठी घेऊन येत आहेत. अनेक जण आपल्याला बजेटमध्ये बसेल अशा गाडीच्या प्रतिक्षेत असतात, तुम्ही देखील आपल्या बटेच कारची स्वप्ने पाहत असाल तर या दिवाळीत या कंपन्यांनी आणलेल्या त्यांच्या स्पेशल मॉडेल नक्कीच पहायला हव्यात.

पुढील महिन्यात लाँच होणाऱ्या जबरदस्त गाड्यांमध्ये news generation maruti suxuki celerio आणि Tata Tiago CNG त्याचप्रमाणे New Audi Q5 आणि New Volkswagen Tiguan या गाड्यांचा समावेश आहे. काय आहेत या गाड्यांचे फिचर्स आणि त्याची किंमती जाणून घ्या.

- Advertisement -

दिवाळीच्या दिवसात टाटा मोटर्स त्यांची Tata tiago CNG ही नवी कार लाँच करणार आहेत. या कारची किंमत अद्याप सांगण्यात आलेली नाही. मीडिया रिपोर्टनुसार, टाटा टिएगोच्या मिड लेवल XT आणि XZ ट्रिममध्ये सीएनजीचा ऑप्शन देण्यात येऊ शकतो.  त्याचप्रमाणे या कारमध्ये १.२ लीटरचे ३ सिलेंडर पेट्रोल इंजिन देखील पहायला मिळत आहे. असे सांगण्यात येत आहे की टाटा टिएगो सीएनजी व्हेरिएंटची किंमत फॉलिस फ्यूल व्हेरिएंच्या तुलनेत ५०-६० हजार रुपयांनी अधिक असू शकते.

दिवाळीच्या मुहूर्तावर ऑडी आपली बेस्ट सेलिंग एसयूवी क्यू५चे फेसलिफ्ट वर्जन Audi Q 5 Facelife लाँच करणार आहे. या कारचे प्रोडक्शन हे भारतात करण्यात आले आहे. या गाडीची अँडव्हान्स बुकींग सुरू झाली असून कारची किंमत पुढील महिन्यात सांगितली जाणार आहे. या कारमध्ये ग्राहकांना अनेक फिचर्स देखील मिळणार आहेत.

- Advertisement -

तर फॉक्सवॅगन कंपनी देखील आपली एसयूव्ही टिगुआनचे अपडेट वर्जन असलेल्या New Volkswagen Tiguan लाँच करणार आहे. या कारच्या रियर आणि फ्रंट लुकमध्ये बरेच बदल झाल्याचे पहायला मिळणार आहे तर सोबतच अनेक नवीन फिचर्स देखील पहायला मिळणार आहे.


हेही वाचा – OLA Cars १० हजार नव्या कामगारांना करणार भरती, १२ महिन्यात २ बिलियन डॉलर कमाईचे लक्ष्य

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -