घरटेक-वेकशाओमीचा Mi 10T Lite स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फीचर्स

शाओमीचा Mi 10T Lite स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फीचर्स

Subscribe

Xiaomi ने आज Mi 10T Lite स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनमध्ये 64MP चा क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याची 6GB रॅम आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे २४,००० रुपये आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत सुमारे २८,३०० रुपये आहे. फोन निळ्या, रोज गोल्ड बीच आणि पर्ल ग्रे या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. Mi 10T Lite स्मार्टफोनची सेल विक्री १४ ऑक्टोबरपासून सुरू होईल.

Mi 10T Lite स्मार्टफोन ड्युअल सिम (Nano) कनेक्टिव्हिटीसह सादर करण्यात आला आहे. Mi 10T Lite अँड्रॉइड 10 बेस्ड MIUI 12 वर काम करेल. फोनला 6.67 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनच्या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सल असेल. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी गोरिल्ला ग्लास ५ चा वापर केला गेला आहे. फोनमध्ये नवीन Qualcomm Snapdragon 750G SoC वापरण्यात आला आहे.

- Advertisement -

Mi 10T Lite स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी लेन्स 64MP आहे. याशिवाय 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स, 2MP मॅक्रो कॅमेरा, 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा देण्यात आला आहे. Mi 10T Lite मध्ये 128GB पर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे. फोनमधील कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G LTE, Wi-Fi, ब्लूटूथ, GPS/ A-GPS, NFC आणि USB Type-C सपोर्ट देण्यात आला आहे. फोनमध्ये 4,820mAh बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जरच्या मदतीने चार्ज करता येणार आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -