घरटेक-वेक64MP कॅमेरा आणि 90Hz डिस्प्लेसह Mi 11 Lite भारतात लाँच; जाणून...

64MP कॅमेरा आणि 90Hz डिस्प्लेसह Mi 11 Lite भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

Subscribe

सर्वात हलका आणि पातळ Mi 11 lite स्मार्टफोन आज भारतात लाँच झाला आहे. Mi 11 lite स्मार्टफोनचा थिकनेस ६.८ mm आहे. तर वजन १५७ ग्रॅम इतके आहे. iPhone 12 पेक्षा Mi 11 lite सर्वात जास्त पातळ स्मार्टफोन आहे, असा दावा शाओमीने केला आहे. Mi 11 lite स्मार्टफोन Tuscany Coral, Jazz Blue आणि Vinyl Black या कलर ऑप्शनमध्ये येतो. हा जबरदस्त स्मार्टफोन तुम्ही ऑफिशियल वेबसाईटसह ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart खरेदी करू शकता.

Mi 11 liteची किंमत

Mi 11 liteच्या 6GB रॅम +128GB व्हेरियंटची किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे. लाँच ऑफर अंतर्गत फोन १ हजार ५०० रुपये डिस्काउंटसह २० हजार ४९९ रुपयांत खरेदी करू शकाल. तर HDFC बँक ऑफरसह स्मार्टफोन १८ हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता. शिवाय Mi 11 lite स्मार्टफोनच्या 8GB रॅम +128GB व्हेरियंट २३ हजार ९९९ रुपयांत येईल. फोनच्या प्री-ऑर्डरवर १ हजार ५०० रुपयांच्या सूटवर खरेदी करू शकाल. यामुळे तुम्हाला २१ हजार ४९९ रुपयांत हा स्मार्टफोन येईल. HDFC बँक ऑफरवर फोन २० हजार ९९९ रुपयांत खरेदी करू शकता.
Mi 11 lite स्मार्टफोन २५ जूनपासून प्री-ऑर्डर करू शकाल. या फोनची विक्री २८ जूनपासून सुरू होणार आहे.

- Advertisement -

Mi 11 liteचे फिचर्स

Mi 11 liteमध्ये ६.५ इंचाचा एक फ्लॅट OLED पॅनल दिला गेला आहे. फोन फूल एचडी प्लस एमोलेड डॉट डिस्प्लेसोबत आला आहे. डिस्प्लेचे रेझोल्यूशन 2400/1080 पिक्सल आहे. तर सक्रीन ब्राइटनेस 500nits आहे. फोन 90Hz स्क्रीन रिफ्रेश्ड आणि 240 Hz टच सँपलिंग रेटसोबत दिला गेला आहे. तर फोन 10-bit डिस्प्ले सपोर्ट करणारा आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी Corning Gorilla Glass 5 दिला आहे. तसेच या फोनच्या रियर पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. याचा प्राइमरी कॅमेरा 64MP आहे. शिवाय एक 8MPचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि एक 5MPचा टेलिफोटो लेंस आहे. यामध्ये व्हिडिओ एडिटिंगचा सपोर्ट दिला गेला आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी एक 16MPचा कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या 4G व्हेरियंटमध्ये Snapdragon 732G वापर केला गेला आहे. तर 5G कनेक्टिव्हीटीवाल्या व्हेरियंटमध्ये Snapdragon 780G चिपसेटचा सपोर्ट मिळेल. दरम्यान 5G व्हेरियंटची लाँचिंग मागणीवर अवलंबून असेल. फोन अँड्राइड 11 बेस्ड MIUI 11 करेल. फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 4250 mAhची बॅटरी दिली गेली आहे, जी 33W फास्ट चार्जिंगसह येते.

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -