घरटेक-वेकMi Smart Band 5 आणि Mi Watch Revolve उद्या भारतात लाँच; वाचा...

Mi Smart Band 5 आणि Mi Watch Revolve उद्या भारतात लाँच; वाचा किमंत

Subscribe

भारतीय बाजारपेठेत चीनच्या Xiaomi कंपनीच्या प्रॉडक्ट्सला नेहमीच पसंती मिळते. स्वस्त आणि मस्त कॅटेगरीत या कंपनीचे सर्वच टेक प्रॉडक्ट्स असल्यामुळे भारतीयांची उडी ही गॅझेट विकत घेण्यावर पडते. आता Xiaomi कंपनी Smarter Living 2021 या व्हर्च्युअल लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून मंगळवारी २९ सप्टेंबर रोजी दोन नवे गॅझेट भारतात लाँच करत आहे. यावेळी स्मार्ट फोन नाही स्मार्ट बँड आणि स्मार्ट वॉच, स्मार्ट स्पीकर्स सारखे प्रॉडक्ट लाँच केले जाणार आहेत. लाँच होण्याच्या अगोदरच दोन्हीची किंमत लीक झालेली आहे. Mi Band 5 हा भारतात २,९९९ रुपये पर्यंत मिळेल तर Mi Watch Revolve ची किंमत ९,९९९ रुपयांपर्यंत असल्याचे कळते.

Mi Smart Band 5 हा बँड ४ चे पुढचे व्हर्जन आहे. यामध्ये मॅग्नेटिक चार्जिंगचा ऑप्शन देण्यात येणार आहे. ग्लोबली बँड ५ हा जूनमध्येच लाँच करण्यात आला होता. बँड ५ मध्ये १.१ इंचचा करल Amoled Display देण्यात आला आहे. ११ स्पोर्ट मोड, १०० नवीन Animated Watch Face असतील. NFC वेरियंटमध्ये १४ दिवसांची बॅटरी बॅकअप असेल तर स्टँडर्ड वेरियंटमध्ये २० दिवसांची बॅटरी बॅकअप असेल.

- Advertisement -

Mi Watch Revolve मध्ये स्लीप मॉनिटरिंग, हार्ट रेट मॉनिटरिंग, Vo2 Max सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. याचा डिस्प्ले १.३९ इंच एवढा असेल. तर Resolution 454 X 454 पिक्सलचे असेल. सोबत 420 mAh बॅटरी दिली गेली आहे. त्यामुळे बॅटरी लाईफ १४ दिवसांचा असू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -