घरटेक-वेकMicromax IN Note 2 झाला लाँच; जाणून घ्या फिचर्स आणि बरचं काही

Micromax IN Note 2 झाला लाँच; जाणून घ्या फिचर्स आणि बरचं काही

Subscribe

मायक्रॉमॅक्सने आपला नवा स्मार्टफोन Micromax IN Note 2 लाँच केला आहे. हा स्मार्टफोन फक्त एक कॉन्फिग्रेशन आणि दोन कलर ऑप्शनमध्ये येतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी आणि AMOLED डिस्प्ले सारखे फिचर्स देण्यात आले आहेत. जाणून घ्या मायक्रॉमॅक्सच्या या मोबाईलबाबत….

Micromax IN Note 2 हा तुम्ही Filpkartवर खरेदी करू शकता. 4GB RAM + 64GB स्टोरेजचा हा फोन ३० जानेवारीपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. कंपनीने हा फोन इंट्रोडक्टरी प्राईसमध्ये लाँच केला आहे. तुम्ही १२ हजार ४९० रुपयांत खरेदी करू शकता. सध्या कंपनीने हा डिव्हाईस १३ हजार ४९० रुपयांत लाँच केला आहे.

- Advertisement -

काय आहे खास?

मायक्रोमॅक्सचा हा फोन Android एक्सपीरियन्ससोबत येतो. फोनमध्ये ग्लास बॅक डिझाईन मिळेल. तसेच स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचचा फूल एचडी प्लस AMOLED स्क्रीन मिळेल, जे 20:9 आस्पेक्ट रेशियोसोबत येईल. फोनमध्ये 60Hz रिफ्रेश रेटवाला 1080×2400 पिक्सलचा रेझोलूशन पॅनल दिला गेला आहे. तसेच याच्या प्रोटेक्शनसाठी कंपनीने Corning Gorilla glass दिला आहे.

फिचर्स

डिव्हाईसला पॉवर देण्यासाठी octa-core MediaTek Helio G95 प्रोसेसर मिळेल, जो Mali G76 MC4 GPU सोबत येईल. फोन फक्त एका कॉन्फिग्रेशन 4GB RAM + 64GB लाँच झाला आहे.

- Advertisement -

Micromax IN Note 2 मध्ये क्वाड रिअर कॅमेरा सेटअप दिला गेला आहे. यामध्ये 48MPचा प्रायमरी सेंसर, 5MPचा अल्ट्रा व्हाईड अँगल लेंस, 2MPचा मॅक्रो लेंस आणि 2MPचा आणखीन एक लेंस येईल. तर फ्रंटमध्ये कंपनीने 16MPचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोन Android 11वर काम करेल.

दरम्यान डिव्हाईसला पावर देण्यासाठी 5000mAh बॅटरी दिली गेली असून 30W चा चार्जिंग सपोर्ट दिला आहे. २५ मिनिटांत हा फोन ५० टक्के चार्ज होतो. स्मार्टफोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला गेला आहे, जो पॉवर बटणवर लावला आहे. यामध्ये WiFi, ब्लूटूथ, जीपीएस, 3.5mm ऑडिओ जॅक, टाईप-सी चार्जिंग पोर्ट आणि एफएम रेडिओसारखे फिचर्स देण्यात आले आहेत.


हेही वाचा – तुमच्या मोबाईलवर देखील असू शकतात Covid-19चे विषाणू, सुरक्षित राहण्यासाठी ‘या’ गोष्टी करा फॉलो


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -