घरटेक-वेकमायक्रोसॉफ्टने Surface सीरिजमधला सर्वात स्वस्त लॅपटॉप केला लाँच

मायक्रोसॉफ्टने Surface सीरिजमधला सर्वात स्वस्त लॅपटॉप केला लाँच

Subscribe

मायक्रोसॉफ्टने (Microsoft) आपल्या सरफेस (Surface) सीरिजचा सर्वात स्वस्त लॅपटॉप Microsoft Surface Go लाँच केला आहे. याशिवाय कंपनीने अपडेटेड Surface Pro X पण बाजारात लाँच केला आहे, जो आधीच्या तुलनेत बऱ्याच खास फिचर्ससह लाँच झाला आहे. Microsoft Surface Go सध्या अमेरिकेत लाँच करण्यात आला आहे. तर Surface Pro X भारतात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Microsoft Surface Go किंमत

Microsoft Surface Goची युएसमध्ये ५४९.९९ डॉलर म्हणजे जवळपास ४० हजार ३०० रुपये किंमतीत लाँच केला आहे. तसेच हा लॅपटॉप प्री बुकिंगसाठी उपलब्ध झाला आहे. हा लॅपटॉप आइस ब्लू, स्टँडस्टोन आणि प्लॅटिनम कलर व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. पण कंपनीने भारतातील किंमत आणि उपलब्धता याबाबतची माहिती दिली नाही आहे.

- Advertisement -

Microsoft Surface Pro X किंमत

भारतात Microsoft Surface Pro Xया डिव्हाईसच्या 16GB + 256GB LTE मॉडलेची किंमत १ लाख ४९ हजार ९९९ रुपये आहे. तर 16GB + 512GB LTE ची किंमत १ लाख ७८ हजार ९९९ रुपये आहे. हा लॅपटॉप प्लेटिनम आणि ब्लॅक कलरच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. कंपनी भारतात या लॅपटॉपच्या लाँचिंगसह प्री-बुकिंगसाठी लॅपटॉप उपलब्ध करून दिला जाणार जाईल. हा लॅपटॉप १३ ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Microsoft Surface Pro X फिचर्स

Microsoft Surface Pro X मध्ये 2,880×1,920 पिक्सलचे स्क्रीन रेझोल्यूझनसह १३.० इंचाचा डिस्प्ले दिला गेला आहे. यामध्ये Microsoft SQ 2 प्रोसेसर दिले असून यामध्ये Adreno 690 जीपीयू देण्यात आला आहे. यामध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय ५, ब्लूटूथ ५.०, Qualcomm Snapdragon X24 LTE मॉडम, nanoSIM आणि eSIM सपोर्ट असे फीचर्स देण्यात आले आहेत. याशिवाय नवीन Surface Pro X मध्ये युजर्सना accelerometer, gyroscope, magnetometer आणि ambient light सेन्सर मिळेल.

- Advertisement -

हेही वाचा – केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे मोबाईल फोन महागणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -