घरटेक-वेकमिशन 'गगनयान'ला हिरवा कंदील

मिशन ‘गगनयान’ला हिरवा कंदील

Subscribe

'गगनयान' या मिशन अंतर्गत अंतराळवीरांना घेऊन हे यान पृथ्वीपासून ३०० ते ४०० किमी अंतराच्या कक्षेत हे यान ७ दिवस प्रदक्षिणा घालेल आणि पृथ्वीचा अभ्यास करेल.

इस्रोच्या महत्वपूर्ण अशा एका अभियानाला कॅबिनेटच्या बैठकीत हिरवा कंदील मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून मिशन ‘गगनयान’ असे या मिशनचे नाव आहे. यासाठी १० हजार कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या मिशन अंतर्गत तीन सदस्य ७ दिवसांसाठी अंतराळात राहणार आहेत.

४० महिन्यांच्या आत होणार मिशन लाँन्च

गगनयान मिशनला मंजुरी मिळाल्यानंतर आता ४० महिन्यांच्या आत ही योजना लाँच करण्यात येणार आहे. पंतप्रधांनी स्वत:च या मिशनची घोषणा केली होती. हे मिशन २०२२ पर्यंत पूर्ण होईल.शिवाय या भारतीय यानातून भारताचा पहिला सुपुत्र किंवा सुकन्या अंतराळात झेपावेल आणि तेथे तिरंगा फडकवेल,अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली होती. या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या मदतीसाठी भारताने रशिया आणि फ्रान्ससोबत करार केला आहे.

- Advertisement -
३० हजार पबजी प्लेअर्सना केले हॅक, जाणून घ्या कारण

तर भारत ठरणार चौथा देश

आतापर्यंत मानवासह अंतराळयान सोडणारे तीनच देश आहे. अमेरिका,रशिया आणि चीन या तीनच देशांनी आतापर्यंत मानवयान अंतराळात पाठवले आहे. आता गगनयानची यशस्वी भरारी झाल्यानंतर भारत हा चौथा देश असणार आहे. या आधी भारतीय अंतराळवीर इतर देशांच्या अंतराळ मोहिमेतून अंतराळात गेले आहे. पण आता ही नवी मोहीम भारताच्या अंतराळ संशोधनासाठी महत्वाचे असणार आहे.

मंगळ ग्रहावरील खड्ड्यात ‘बर्फ’, पाहा फोटो

काय आहे गगनयान मिशन?

‘गगनयान’ या मिशन अंतर्गत अंतराळवीरांना घेऊन हे यान पृथ्वीपासून ३०० ते ४०० किमी अंतराच्या कक्षेत हे यान ७ दिवस प्रदक्षिणा घालेल. अंतराळात यान असण्याच्या कालावधीत अंतराळवीर कमी गुरुत्वाकर्षणात वावरण्याचा, कामे करण्याचा सराव आणि प्रयोग करतील. या आधी दोनदा मानवरहित यान पाठवून चाचणी केली जाणार आहे. या यानाच्या उड्डाणासाठी जीएसएलव्ही- मार्क३ वापरले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -