घरटेक-वेकPaytm, Mobikwik अशा ई-वॉलेटवर येणार बंदी?

Paytm, Mobikwik अशा ई-वॉलेटवर येणार बंदी?

Subscribe

RBI च्या सुचनेनुसार मोबाईल वॉलेटची सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्या त्यांच्या युझर्सच्या KYC प्रक्रिया पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत.

मागील एक-दोन वर्षांमध्ये Paytm, Mobikwik अशा ई-वॉलेटवरुन व्यवहार करण्याचं प्रमाण वाढलं आहे. मात्र, अशाप्रकारच्या मोबाईल वॉलेट्सवर येत्या मार्चपासून बंदी येण्याची शक्यता आहे. भारतात Paytm तसंच Mobikwik सारख्या मोबाईल वॉलेट सेवा पुरवणाऱ्या कंपनी भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या KYC प्रक्रियेची डेडलाईन पूर्ण करु शकणार नसल्याचं, मीडिया रिपोर्टमधून समोर आलं आहे. कंपन्यांद्वारे डेडलाईन पूर्ण न झाल्यामुळे सुमारे ९५ टक्के युझर्सची मोबाईल वॉलेट सुविधा बंद होण्याची शक्यता आहे. प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रूमेंट आणि मोबाईल वॉलेट सेवा प्रदान करणाऱ्या कंपन्यांसाठी RBI ने ऑक्टोबर २०१७ मध्ये एक डेडलाईन जारी केली होती. यामध्ये कंपन्यांना युझर्सची संपूर्ण माहिती KYC च्या माध्यमातून घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र, या कंपन्यांच्या बहुतांश युझर्सचे KYC डेटाचे बायोमेट्रिक किंवा फिजिकल व्हेरिफिकेशन अजूनही झाले नसल्याचे रिपोर्टमधून समोर आले आहे.


Flipkart संक्रात धमाका : फक्त 429 रुपयांत मोबाईल

गेल्यावर्षी देण्यात आलेल्या सूचनेनुसार मोबाईल वॉलेटची सेवा पुरवणाऱ्या सर्व कंपन्या बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन्सच्या पर्यायी व्यवस्थेच्या माध्यमातून KYC पूर्ण करण्याच्या प्रयत्नात आहेत. रिपोर्ट्सनुसार, भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे देण्यात आलेल्या या डेडलाईनला पूर्ण करण्यासाठी सर्व कंपन्या व्हिडिओवर आधारित किंवा XML वर आधारित पडताळणीची व्यवस्था आणण्याच्या तयारीत आहेत. मात्र, RBI ने या निर्णयाला परवानगी नाकारली आहे. मात्र, मोबाईल वॉलेट कंपन्या फिजिकल किंवा बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनच्या वैकल्पिक व्यवस्थेची वाट पाहत आहेत. याशिवाय कंपन्यांना देण्यात आलेली डेडलाईन जवळ आली असून, त्या तुलनेत KYC चे खूप काम बाकी आहे. त्यामुळे हे काम पूर्ण न झाल्यास
Paytm, Mobikwik सारखे मोबाईल वॉलेट मार्चपासून बंद होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -