घरटेक-वेकMoto G8 Power Lite स्मार्टफोनची आजपासून विक्री, किंमत ८,९९९ रुपये

Moto G8 Power Lite स्मार्टफोनची आजपासून विक्री, किंमत ८,९९९ रुपये

Subscribe

Moto G8 Power Lite या स्मार्टफोनची भारतात आजपासून विक्रि सुरु झाली आहे. मोटोरोलाचा नवीनतम बजेट फोन फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध होता. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा आणि वॉटरड्रॉप-स्टाईल डिस्प्ले नॉच देण्यात आला आहे. तसेच, यात MediaTek Helio P35 प्रोसेसर आणि 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे.

Moto G8 Power Liteची किंमत भारतात सिंगल 4GB + 64GB व्हेरिएंटसाठी ८,९९९ रुपये आहे. हा फोन आर्कटिक ब्लू आणि रॉयल ब्लू कलर ऑप्शन्समध्ये लाँच करण्यात आला आहे. हे दोन्ही रंग पर्याय फ्लिपकार्टवर दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सेलच्या ऑफर्सबद्दल बोलताना फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून Moto G8 Power Lite वर ५ टक्के कॅशबॅक देण्यात येईल. याशिवाय महिन्याला ७५० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवरही ग्राहकांना नॉन-कॉस्ट ईएमआय पर्याय मिळेल. Moto G8 Power Liteची जागतिक लाँचिंग एप्रिलमध्ये झाली होती. ही Moto G8 Powerची अवनत आवृत्ती आहे. हा फोन गेल्या आठवड्यातच भारतात लाँच करण्यात आला.

- Advertisement -

Moto G8 Power Lite चे स्पेशिफिकेशन

ड्युअल-सिम (नॅनो) सपोर्ट असणारा हा स्मार्टफोन अँड्रॉइड पाईवर चालतो आणि त्यात ६.५ इंचाचा एचडी प्लस (720×1,600 पिक्सल) आयपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 4GB रॅमसह ऑक्टा-कोर MediaTek Helio P35 प्रोसेसर आहे. फोटोग्राफीसाठी, त्याच्या मागील बाजूस एक ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्राथमिक कॅमेरा 16MP चा आहे, दुसरा कॅमेरा 2MP चा आहे आणि तिसरा कॅमेरा देखील 2MP चा आहे. सेल्फीसाठी 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनला 5,000mAhची बॅटरी देण्यात आली आहे.


हेही वाचा – Mercedes-AMG GT R आणि AMG C 63 Coupe भारतात लाँच

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -