Moto Z3 – जगातला पहिला 5G स्मार्टफोन

Moto Z3 हा भन्नाट 5G फोन लवकरच भारतात लाँच होणार असून, भारतीय ग्राहकही या फोनसाठी उत्सुक आहेत.

motorola कंपनीचा moto Z3 स्मार्टफोन (सौजन्य- सोशल मीडिया)

स्मार्टफोन बनवणाऱ्या Motorola या भारतीय कंपनीने युजर्सना नुकतीच एक खुशखबर दिली आहे. गुरुवारी कंपनीने केलेल्या अधिकृत घोषणेनुसार, लवकरच भारतात Moto Z3 हा समार्टफोन लाँच करण्यात येणार आहे. Moto Z3 हा कंपनीचा प्रिअियम स्मार्टफोन आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये 5G नेटवर्कची सुविधा उपलब्ध असून, त्यासाठी खास 5G मोटो मोडही देण्यात आला आहे. या 5G मोटो मोडद्वारे फोनला थेट अमेरिकन टेलिकॉम कंपनीच्या वेरिजॉन 5G नेटवर्कला जोडता येईल. Moto Z3 हा भारतामध्ये लाँच होणार पहिला 5G स्मार्टफोन ठरणार आहे. दरम्यान २०१९ पासून ही 5G नेटवर्कची सुविधा सुरु होणार असल्याचं कंपनीने सांगण्यात आलं आहे. सध्या हा फोन अमेरिकेमध्ये विक्रिसाठी उपलब्ध असून त्याची किंमत ४६० डॉलर म्हणजेच सुमारे ३२ हजार २०० रुपये इतकी आहे. Motorola ने केलेल्या या घोषणेनंतर आता भारतीय युजर्सची Moto Z3 फोनबद्दलची उत्सुकता नक्कीच वाढली असणार.

काय आहे 5G मोटो मोड ?

मोटोरोलाचा हा 5G मोटो मोड अॅडिशनल कव्हरप्रमाणे काम करणार आहे. एखाद्या सामान्य कव्हरप्रमाणे दिसणारं हे 5G मोटो मोड कव्हर, Z3 स्मार्टफोनच्या पाठच्या बाजूला लावलं जाईल. या मोडच्या माध्यमातून Z3 वापरणारे युजर्सला हायस्पीड 5G कनेक्टिव्हीटी मिळेल आणि युजर्स सुपफास्ट स्पीडने इंटरनेट वापरु शकतील. कंपनीनने दिलेल्या माहितीनुसार, सध्या अमेरिकेच्या काही शहरांमध्ये या 5G मोटो मोडची चाचणी घेण्याचं काम सुरु आहे. या चाचणीनंतर तेथील टेलिकॉम कंपनी वेरिजॉनद्वारे अमेरिकेच्या ४ प्रमुख शहरांत ही सेवा देण्यात येईल.

5G Moto Mod
Z3 स्मार्टफोनमधील 5G Moto Mod (सौजन्य- सोशल मीडिया)

Moto Z3 चे फिचर्स

  • 6 इंचाचा डिस्प्ले, 1 हजार 80 पिक्सलच्या रेझ्युलुशनसह
  • स्नॅपड्रॅगन क्वालकॉम 835 चिपसेट प्रोसेसर
  • 3 हजार एमएएच क्षमतेची बॅटरी
  • 12 + 12 मेगापिक्सलचा ड्युएल बॅक कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
  • 4 GB रॅम तर 32 GB इंटरनल मेमरी
  • Wi-Fi, GPS, Bluetooth, NFC, 3G आणि 4G द्वारे कनेक्टव्हिटीची सोय