Motorola चा आणखी एक स्वस्तातला स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या फीचर्स

या स्मार्ट फोनला लवकरच भारतातही लाँच करण्यात येणार आहे.

Motorola कंपनीने त्याचा स्वस्त स्मार्टफोन 5G लाँच केल्यानंतर आता Motorola Moto G 5G नंतर आपल्या फ्लॅगशिप मोबाईल Motorola Edge S हा स्मार्टफोन देखील बाजारात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन बाजारात लाँच करताना कंपनीने ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत भन्नाट फीचर्स लाँच केले आहे. चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनची किंमत १९९९ चिनी युआन म्हणजेच २२ हजार ५४५ रूपये आहे. हा स्मार्टफोनला ६ कॅमेरा, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८७० एसओसी प्रोसेसर, ६.७ इंचाचा एलसीडी स्क्रीन आणि ९० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह Motorola चा Motorola Moto G 5G बाजारात उपलब्ध करण्यात आला आहे.

६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या Motorola Edge S या स्मार्टफोनची किंमत २२ हजार ५४५ रूपये तर ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या स्मार्टफोनची किंमत ३१ हजार ५५७ रूपये आहे. यासह Motorola Edge S हा स्मार्टफोन ग्राहकांना ३ व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असणार आहे. Motorola च्या या स्मार्टफोनला क्वॉड रिअर कॅमेरासह लाँच करण्यात आला आहे. या फोनला क्वॉड रिअर कॅमेऱ्यासह सेकंडरी कॅमेरा १६ मेगापिक्सल असणाऱ्या अल्ट्रावाईड लेन्स दिला आहे तर २ मेगापिक्सलचा डेप्श कॅमेरा सेन्सरसह TOF 3D कॅमेरा आहे.

असे आहेत या फोनचे फीचर्स

  • Motorola Edge S या स्मार्टफोनला ड्यूल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये १६ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. तर सेकेंडरी सेन्सर असणारा कॅमेरा ८ मेगापिक्सलचा देण्यात आला आहे.
  • Motorola Edge S या स्मार्टफोनमध्ये ५००० mAh बॅटरी देण्यात आली असून २० वॅट फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आले आहे.
  •  या फोनला ६.७ इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आलेला आहे. या स्मार्टफोनच्या डिस्प्ले स्क्रीनची साईज १०८०X 2520 पिक्सल देण्यात आली असून हा फोन अँड्रॉईड ११ वर आधारलेला आहे.
  • या फोनमध्ये Qualcomm SM8250-AC स्नॅपड्रॅगन ८७० 5G प्रोसेसर देण्यात आला आहे.