घरटेक-वेकघर खरेदी गुंतवणुकीबाबत मुंबईचे स्थान घसरले

घर खरेदी गुंतवणुकीबाबत मुंबईचे स्थान घसरले

Subscribe

घर खरेदीसाठी पूर्वी मुंबईला सर्वाधिक पसंती दिली जायची. मात्र आता मुंबईचे हे स्थान आयटी हब म्हणून पुढे आलेल्या बंगळुरू शहराने घेतले आहे. बंगळुरूमध्ये घरांची मागणी वाढली आहे. मात्र घर खरेदी गुंतवणुकीच्या दुसर्‍या क्रमांकावर मुंबई आहे. यात पुण्याचा पाचवा क्रमांक लागतो.

ट्रॅक २ मीडियाने ‘बेस्ट प्रॅक्टिसेस रिपोर्ट २०१९’ हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. यामध्ये मेट्रो शहरातील आयटी नोकरीच्या संधी, आयटीशी संबंध सेवा आणि स्थावर मालमत्ता याविषयी माहिती देण्यात आली आहे.

- Advertisement -

बंगळुरु शहराला गुंतवणुकीसाठी सर्वात अधिक ग्राहकांनी मते दिली आहेत. पहिल्या १० शहरांत दक्षिण भारतातील ४ शहरे आहेत.

दक्षिणेमधील हैदराबादचा तिसरा, चेन्नईचा सातवा तर कोईम्बतूरचा १० वा क्रमांक आहे. मुंबईचा दुसरा क्रमांक आहे. तर गुरुग्रामचा चौथा क्रमांक आहे. तर पुणे पाचव्या, कोलकाता सहाव्या, अहमदाबाद आठव्या आणि चंदीगढ नवव्या क्रमांकावर आहे.

- Advertisement -

स्थावर कंपनीत सेवा देण्यात बंगळुरुची शोभा लि. कंपनी पहिल्या क्रमांकावर, त्यानंतर गोदरेज प्रॉपर्टीज आणि एम्बासी ग्रुपचा क्रमांक आला आहे. कंपनीचे आर्थिक व्यवस्थापन, प्रकल्पाची उभारणी, ग्राहकांशी संपर्क, व्यवहारातील पारदर्शकता या मुद्यांचा सर्वेक्षणात विचार करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -