घरटेक-वेकअंतराळयानाला पडले 'छिद्र', अंतराळातच केली दुरुस्ती

अंतराळयानाला पडले ‘छिद्र’, अंतराळातच केली दुरुस्ती

Subscribe

छिद्र दुरुस्त करण्यासाठी रशियन वॉकर्स यानाच्या दिशेने आले आणि त्यांनी स्पेसमध्येच ही दुरुस्ती केली. विशेष म्हणजे त्यांनी ही दुरुस्ती लाईव्ह केली.

अंतराळात असलेल्या मॉस्कोच्या अंतराळयानाला संशयास्पद छिद्र पडल्यामुळे मॉस्कोचे अंतराळवीर काळजीत पडले होते. हे छिद्र पृथ्वीवर असताना पडले की, अंतराळात आल्यानंतर पडले या प्रश्नाचे अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. पण सुदैवाने हे छिद्र बुजवण्यात रशियन स्पेसवॉकर्सना यश आलेले आहे आणि त्यांनी पडलेल्या छिद्राचा भाग पृथ्वीवर अधिक तपासासाठी पाठवला आहे. आता हे छिद्र पाहिल्यानंतरच नेमके यानासोबत काय झाले हे कळू शकणार आहे.

लाईव्ह करण्यात आली दुरुस्ती

छिद्र दुरुस्त करण्यासाठी रशियन वॉकर्स यानाच्या दिशेने आले आणि त्यांनी स्पेसमध्येच ही दुरुस्ती केली. विशेष म्हणजे त्यांनी ही दुरुस्ती लाईव्ह केली. पहिल्यांदाच अंतराळात दुरुस्तीचे सामान घेऊन अशा प्रकारे दुरुस्ती करण्यात आली. पृथ्वीवरुन लाईव्ह संवाद करत ही दुरुस्ती करण्यात आली. मॉस्कोच्या ‘सोयुझ’ या स्पेसशीपला दोन मिलीमीटर इतकं छिद्र पडलं होतं. जे छिद्र अंतराळयानासाठी धोकादायक होतं. त्यातून हवेची गळती होत होती. ऑगस्ट महिन्यात ही बाब अंतराळवीरांच्या निदर्शनास आली. त्यानंतर आता दोन महिन्यानंतर ही दुरुस्ती करण्यात आली आहे.

- Advertisement -


आल्या अनेक अडचणी 

अंतराळात उतरुन अशा प्रकारे दुरुस्ती करणे फार कठीण होते. कारण यानाला बाहेरुन पकडून ठेवण्यासाठी कोणतेच रेलिंग नव्हते. अंतराळात असे काही नसेल तर अंतराळवीर पुन्हा परतण्याची शक्यता नसते. त्यामुळे वेगळ्या शकला लढवून या अंतराळयानाला धरुन ठेवण्यासाठी वेगळया गोष्टींचा वापर करण्यात आला आणि मिशन फत्ते करण्यात आले.

- Advertisement -

दोन महिन्यांनी केली दुरुस्ती

अंतराळयानात असलेल्या मॉस्कोच्या अंतराळवीरांनी यानाच्या आतून हे छिद्र पाहिले होते. हे छिद्र पृथ्वीवर पडले की, अंतराळात याबद्दल अंतराळवीरांना शाश्वती नव्हती. अखेर७ तास  ४५ इतका वेळ या दुरुस्तीसाठी लागला. छिद्र पडलेला भाग काढून दुसरा भाग तिथे लावण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -