घरटेक-वेकमंगळावर आढळली 'ही' गोष्ट

मंगळावर आढळली ‘ही’ गोष्ट

Subscribe

पृथ्वी सोडून इतर ग्रह कसे असतील? असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. सध्या नासाची मंगळमोहीम सुरु आहे. मंगळासंदर्भातल्या नवनव्या गोष्टी रोज समोर येतात. आता मंगळावर अशी गोष्ट आढळली आहे, ज्यामुळे मंगळावर जीवसृष्टी असू शकते. आता साहजिकच मंगळावर जीवसृष्टी असेल, तर ती माणसं कशी असतील? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल.

3.5 अब्ज वर्षांपूर्वीचा दगड

नासाने ‘क्युरोसिटी रोव्हर’ हे यान मंगळ ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठवलं आहे. याच यानाने गोळा केलेल्या माहितीच्या आधारे मंगळावर कधीकाळी जीवसृष्टी असण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मंगळावरच्या ‘ल क्रेटर’ नावाच्या भागात तब्बल ३.५ अब्ज वर्षांपूर्वीचा दगड सापडला आहे. या दगडाच्या अभ्यासावरून त्या ठिकाणी तलाव अस्तित्वात असण्याचा निष्कर्ष नासाच्या अभ्यासकांनी काढला आहे. या दगडाशिवाय आसपासच्या परिसरात मिथेन गॅसचेही कण आढळले आहेत. साधारणपणे प्राणी, वनस्पती आणि वातावरणात आढळतो. या गॅसचे कण मंगळावर आढळल्यामुळे जीवसृष्टीच्या शक्यतेला अजूनच पाठबळ मिळालं आहे. मात्र, मिथेन गॅस भौगोलिक प्रक्रियेतूनही तयार होऊ शकत असल्यामुळे नक्की जीवसृष्टीमुळेच तो मंगळावर अस्तित्वात आला असावा असा ठाम दावा संशोधकांनी केलेला नाही.

- Advertisement -

जीवसृष्टीची शक्यता

मंगळावर जीवसृष्टी असू शकते, हे वाचल्यावर तुम्हाला साहजिकच अनेक प्रश्न पडले असतील. ज्या प्रकारे पृथ्वीवर जीवसृष्टी असल्याच्या वेगवेगळ्या खुणा आहेत, तसे काही गुणधर्म मंगळावर आढळले आहेत. सध्या मंगळावर सापडलेल्या या दगडाचा अधिक सखोल अभ्यास केला जात आहे. हा दगड नेमका कसा तयार झाला असावा? यावर सध्या नासातील शास्त्रज्ञ अभ्यात करत आहेत. शिवाय मानवी शरीरावरील केस, नखांवरील गुणधर्म असलेले कण मंगळावर सापडले आहेत.

अशी आहे मंगळमोहीम

नासाने आतापर्यंत अनेक मंगळमोहिमा यशस्वी केल्या आहेत. यात नासाने मंगळाच्या कक्षेतील वातावरणाचा अभ्यास केला. परंतु, मंगळावर उतरुन त्याचा अभ्यास अजूनपर्यंत करण्यात आला नव्हता. आता नासाने मंगळाचा सखोल अभ्यास करण्यासाठी ‘क्युरोसिटी रोव्हर’ यान मंगळावर पाठवले असून ११ नोव्हेंबर २०११ रोजी हे यान प्रक्षेपित केले गेले. ६ ऑगस्ट २०१२ रोजी हे यान मंगळावर पोहोचले. मंगळावरील वातावरणाचा अभ्यास हे यान करत आाहे. ५ मे ला हे यान मंगळावरील ल क्रेटर भागात पोहोचले.  जूनला या ठिकाणी जीवसृष्टीच्या खुणा आढळून आल्या. या पुढील नासाची मंगळ मोहीम ही मानवी मंगळमोहीम असणार असून त्याची तयारी सध्या सुरु आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -