Samsung चा सर्वात स्वस्त फोन आला, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत!

सॅमसंग गॅलेक्सी A01e स्मार्टफोन अँड्रॉइड १० वर आधारित असेल.

सॅमसंगने स्मार्टफोन गॅलेक्सी A 01 लाँच केला. सॅमसंगच्या गॅलेक्सीच्या मालिकेतील हा सर्वात परवडणारा स्मार्टफोन आहे. सॅमसंग आता गॅलेक्सी A 01 स्मार्टफोनचा स्वस्त प्रकार आणण्याचा निर्णय घेतला आहे. हा परवडणारा सॅमसंग स्मार्टफोनमध्ये एक वैशिष्ट्य म्हणजे या फोनमधून बॅटरी सहज काढता येऊ शकते. सॅमसंगच्या या फोनला गॅलेक्सी A01e असे नाव दिले जाऊ शकते. सॅमसंगचा हा स्मार्टफोन काही प्रमुख वैशिष्ट्यांसह लॉन्च होण्याची शक्यता आहे.

सॅमसंगचा हा स्मार्टफोन गीकबेंच 4 वर मॉडेल नंबर SM –A013F असा दाखविला आहे. या मोबाईचं नाव सॅमसंग गॅलेक्सी A01e असू शकते. सॅमसंगचा स्मार्टफोन गॅलेक्सी A01 मागील वर्षी एसएम-ए 0115 एफ मॉडेल नंबरसह आला होता. सॅमसंगच्या काढण्यायोग्य बॅटरीने चालणार्‍या गॅलेक्सी ए01 ईमध्ये मीडियाटेक एमटी 6739 क्वाड-कोर प्रोसेसर दिसणार असल्याचे गीकबेंच यादीतून स्पष्ट झाले आहे. मागील वर्षी सॅमसंग गॅलेक्सी A01 स्मार्टफोनला ३, ००० एमएएच बॅटरी देण्यात आली होती. गीकबेंच यादीनुसार गॅलेक्सी A01 च्या नवीन व्हेरिएंटमध्ये समान क्षमतेची बॅटरी असू शकते.

गीकबेंच यादीनुसार, सॅमसंग गॅलेक्सी A01e स्मार्टफोन अँड्रॉइड १० वर आधारित असेल. हा सॅमसंग फोन १  जीबी रॅमसह येऊ शकतो. सिंगल कोअर टेस्टमध्ये या स्मार्टफोनने ५४२  गुण मिळवले. त्याच वेळी, मल्टी-कोर चाचणीमध्ये फोनला १४६८  गुण मिळाले आहेत.

सॅमसंग गॅलेक्सी ०१ स्मार्टफोनच्या आधीच्या सीरीजमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा दुय्यम कॅमेरा आहे. त्याच वेळी सेल्फीसाठी फोनच्या समोर ५ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

सॅमसंगने नुकताच भारतात गॅलेक्सी A 31 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी + इन्फिनिटी यू डिस्प्ले आहे. फोनमध्ये ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज आहे. आपण मायक्रोएसडी कार्डद्वारे फोनचे स्टोरेज ५१२ जीबी पर्यंत वाढवू शकता. या स्मार्टफोनची किंमत २१,९९९ रुपये आहे.


हे ही वाचा – मुलीने लग्नाला नकार दिला म्हणून मुलाने पळवून नेलं उसाच्या शेतात आणि…!