घरटेक-वेकSamsung चा नवा 5G फोन उद्या होणार लाँच; जाणून घ्या किंमतीसह फिचर्स

Samsung चा नवा 5G फोन उद्या होणार लाँच; जाणून घ्या किंमतीसह फिचर्स

Subscribe

Samsung Galaxy A52s 5G स्मार्टफोन उद्या, 1 सप्टेंबर 2021 रोजी भारतात लाँच होणार आहे. मात्र हा स्मार्टफोन लाँच होण्यापूर्वी या फोनची किंमत लीक झाली आहे. हा फोन Awesome White, Awesome Black आणि Awesome Violet या तीन रंगांत युजर्सना घेता येणार आहे. नुकताच या आगामी गॅलेक्सी A52s 5G स्मार्टफोनचा टीझर व्हिडिओ सॅमसंगने जारी केला आहे, यावरून हा फोन 1 सप्टेंबरला लाँच होणार असल्याचे समजतेय. परंतु कंपनीने अद्याप या फोनची किंमत जाहीर केलेली नाही.

अशी असणार किंमत!

GizmoChina च्या अहवालानुसार, Samsung Galaxy A52s स्मार्टफोन अॅमेझॉनवर देखील उपलब्ध असणार आहे. या फोनची शिपमेंट 6 सप्टेंबरपासून सुरू होईल. असे देखील सांगितले जात आहे की, हा फोन दोन स्टोरेजध्ये उपलब्ध असेल. तसेच या फोनच्या 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये तर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट 38,999 रुपये अशी असणार आहे.

- Advertisement -

असे असतील संभाव्य फीचर्स

मिळालेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy A52s स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा फुल एचडी प्लस एमोलेड दिला जाऊ शकतो. याचे रिझोल्यूशन 1080*2400 पिक्सेल असेल. फोन ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 778G प्रोसेसर सपोर्टसह येणार असून हा फोन अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असून तो One UI वर काम करेल. फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर सपोर्टसह IP67 रेटिंगसह देण्यात येणार असून हा फोन वाटर रजिस्टेंस असणार आहे.

Samsung Galaxy A52s स्मार्टफोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा मेन कॅमेरा 64MP आहे. याशिवाय 12 MPअल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 5 MP डेप्थ सेन्सरला सपोर्ट करण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोन मध्ये 32MP चा कॅमेरा देखील युजर्सना देण्यात येणार आहे. Galaxy A52s स्मार्टफोनला पॉवर बॅकअपसाठी 4500mAh ची बॅटरी मिळणार असल्याचेही सांगितले जात आहे.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -