घरटेक-वेकआता मोबाईलवरून काढता येणार पैसे

आता मोबाईलवरून काढता येणार पैसे

Subscribe

एटीएममधून (ATM) पैसे काढण्यासाठी आता डेबिट कार्डची (Debit Card)ची गरज नाही आहे. यासाठी तुम्हाला एका APPची आवश्यकता आहे. तो म्हणजे युपीआय APP. या APPच्या माध्यमातून तुम्ही क्यूआर कोड् (QR Code) स्कॅन करून एटीएममधून पैसे काढू शकता. एटीएम निर्माता एनसीआर कॉर्पोरेशनने सांगितले की, युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस प्लेटफॉर्मच्या आधारावर पहिला इंटरऑपरेबर कार्डलेस कॅश विड्रॉल (ICCW) लॉन्च केले. या नव्या सुविधेसाठी सिटी युनियन बँक (City Union Bank) ने एनसीआर (NCR) हात मिळवला. बँकेने क्युआर कोड आधारावर इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश विड्रॉल सुविधेला परवानगी देण्यासाठी आपल्या १,५०० एटीएमला पहिल्यापासून अपग्रेड केले आहे.

सिटी युनियन बँकेचे व्यवस्थापकीय संचालक एन. कामकोडी म्हणाले की, आम्ही ICCW सोल्यूशन्स देण्यासाठी NCRसोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना पुढील पिढीचे निराकरण करण्यास मदत होईल. यामुळे आमच्या एटीएमध्ये युपीआय क्युआर कोडचा वापर करून पैस काढता येईल.

- Advertisement -

नव्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी सर्वात पहिल्यांदा स्मार्टफोनमध्ये कोणताही युपीआय APP (GPay, BHIM, Paytm, Phonepe, Amazon) इन्स्टॉल केले पाहिजे. त्यानंतर एटीएम स्क्रीनवर दिसत असलेला क्युआर कोड स्कॅन करायला लागेल. युजर्सला स्क्रीनवर क्युआर कोड स्कॅन करावे लागले आणि आपल्या मोबाईल फोनच्या माध्यमातून अधिकृतरित्या पैसे काढू शकाल. अशाप्रकारे पैशांचा व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी, क्युआर कोड सतत बदलला जाईल. पैसे काढण्याची मर्यादा सध्या ५ हजार इतकी आहे. अशापद्धतीने व्यवहार करणे सर्वात सुरक्षित आहे. कारण कार्डच्या माध्यमातून गैरवापर होतो. पण याद्वारे पैसे काढणे अधिक सुरक्षित आहे.


हेही वाचा – फक्त ३ लाखात इलेक्ट्रिक कार, टेस्लापेक्षा अधिक होतेय विक्री

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -