घरटेक-वेकभारतात 26 नोव्हेंबरला Nokia 2.4 आणि Nokia 3.4 होणार लाँच; जाणून घ्या...

भारतात 26 नोव्हेंबरला Nokia 2.4 आणि Nokia 3.4 होणार लाँच; जाणून घ्या फीचर्स

Subscribe

जाणून घ्या, या स्मार्टफोनचे फीचर्स

Nokia 2.4 स्मार्टफोन अखेर याच महिन्यात लाँच करणार आहे. आता कंपनीने अधिकृत माहिती दिली आहे. भारतात Nokia 2.4 आणि Nokia 3.4 स्मार्टफोन्सला येत्या 26 नोव्हेंबर रोजी लाँच करणार आहे. Nokia मोबाइल इंडियाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक टीजर व्हिडिओ जारी करण्यात आला आहे. या व्हिडिओत Nokia 2.4 आणि Nokia 3.4 ला ‘only 10 days to go’ कॅप्शन सोबत पाहिले जावू शकते. ट्विटवरून हे स्पष्ट झाले आहे की, ब्रँडच्या लेटेस्ट बजेट स्मार्टफोन्सला अधिकृत देशात 26 नोव्हेंबर रोजी लाँच करण्यात येणार आहे.

- Advertisement -

असे आहेत फीचर्स

गेल्या आठवड्यात आलेल्या रिपोर्टमधून ही माहिती समोर आली होती. रिपोर्टमध्ये केवळ Nokia 2.4 ची केवळ भारतात माहिती होती. Nokia 2.4 ला विक्रीसाठी लाँच नंतर तर Nokia 3.4 ला काही दिवसांनंतर विक्रीसाठी उपलब्ध केले जाऊ शकते.

  • Nokia 3.4 अँड्रॉयड 10 ऑपरेटिंग सिस्टम सोबत येतो. या डिव्हाईसमध्ये 6.39 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. बजेट फोनमध्ये पंचहोल डिस्प्ले डिझाइन दिली आहे.
  • हँडसेटमध्ये गुगल असिस्टेंट बटन दिला आहे. Nokia फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर दिला आहे.
  • फोनमध्ये रियर कॅमेऱ्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 5  मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.
  • या फोनमध्ये 8  मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. Nokia 3.4 मध्ये 4000mAh बॅटरी दिली आहे. 10 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला आहे.
  • कंपनीने फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर दिला आहे.
  • नोकियाच्या या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. फोन अँड्रॉयड 10 वर काम करतो.
  • हँडसेटमध्ये मीडियाटेक हीलियो पी 22 प्रोसेसर दिला आहे. Nokia 2.4 मध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.
  • हँडसेटमध्ये 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 4500mAh बॅटरी दिली आहे.

राज्य सरकारचा यू-टर्न; वाढीव वीज बिलातून दिलासा मिळणार नाही

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -