Wednesday, February 17, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक 5 कॅमेऱ्यांच्या Nokia 5.4 स्मार्टफोन आजपासून उपलब्ध; जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

5 कॅमेऱ्यांच्या Nokia 5.4 स्मार्टफोन आजपासून उपलब्ध; जाणून घ्या किंमतीसह फीचर्स

जाणून घ्या, Nokia 5.4 स्मार्टफोनचे फीचर्स

Related Story

- Advertisement -

नोकिया कंपनीचा बजेटमध्ये असणारा Nokia 5.4 हा स्मार्टफोन ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. या स्मार्टफोनचा आजपासून सेल सुरू होणार असून या फोनची सुरूवातीची किंमत 13 हजार 999 रूपये असल्याचे सांगितले जात आहे. या फोनची विक्री आज दुपारी 12 वाजेपासून सुरू होणार आहे. 6 जीबी पर्यंत रॅम आणि 64 जीबी अंतर्गत स्टोरेजसह हा फोन आज बर्‍याच आकर्षक ऑफर्ससहही खरेदी करण्याची ग्राहकांना संधी आहे.

आजच्या सेलमध्ये फ्लिपकार्टवरून हा स्मार्टफोन खरेदी करताना अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डचा वापर करून जर हा फोन खरेदी केला तर ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. याशिवाय हा फोन दरमहा 2,584 रुपये किंमतीच्या ईएमआयवरही खरेदी करता येईल. विशेष म्हणजे एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेऊन तुम्हाला 14,850 रुपयांपर्यंतची अधिक सूटही मिळू शकते.

जाणून घ्या, फीचर्स

  • या फोनमध्ये 720×1560 पिक्सेल रेजोल्यूशनसह 6.39 इंच एचडी + डिस्प्ले देण्यात आला असून हा डिस्प्ले प्रदर्शन 19.5: 9 च्या आस्पेक्ट रेशोसह येते. या फोनचे प्रोसेसर म्हणून स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट 4 जीबी व 6 जीबी रॅम व्हेरिएंटसह देण्यात आला आहे. नोकिया 5.4 मध्ये 64 जीबी अंतर्गत स्टोरेज आहे, जे आपण मायक्रो एसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढवता येणं शक्य आहे.
  • यासह फोटोग्राफी करण्यासाठी या फोनमध्ये विशेष क्वाड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यामध्ये 48 मेगापिक्सलसह प्रायमरी सेन्सरसह एक 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अॅन्गल , एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ आणि एक 2 मेगापिक्सल मॅक्रो क्वाड रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. तर सेल्फीसाठी याफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रन्ट कॅमेरा असणार आहे.
  • रिअर फिंगरप्रिंट सेन्सरसह येणार्‍या या फोनची बॅटरी 4000 mAh आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 4G LTE, वाय-फाय 802.11 b/g/n, ब्लूटूथ 4.2, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी, एफएम रेडियो, यूएसबी टाइप-C और 3.5mm हेडफोन जॅक अशी काही फीचर्स देण्यात आले आहेत.
- Advertisement -