घरटेक-वेकभारतात लवकरच लाँच होणार Nokia चा चार कॅमेरावाला स्ममार्टफोन

भारतात लवकरच लाँच होणार Nokia चा चार कॅमेरावाला स्ममार्टफोन

Subscribe

नोकिया लवकरच नवीन स्मार्टफोन भारतीय बाजारात आणण्याची तयारी करत आहे. अहवालानुसार HMD Global भारतात Nokia 5.3 लाँच करणार आहे. हा फोन मार्चमध्येच जागतिक स्तरावर लाँच करण्यात आला होता. अलीकडेच हा फोन नोकिया इंडियाच्या वेबसाइटवर दाखविण्यात आला. HMD Global कडे नोकिया फोन बनविण्याचा परवाना आहे. कंपनीने त्याचा टीझरही जारी केला आहे. या फोनच्या लाँचची तारीख अद्याप सांगण्यात आली नसली तरी या महिन्यात हा स्मार्टफोन बाजारात येईल अशी शक्यता आहे.

या स्मार्टफोनच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर यात 6.55 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले असेल. या स्मार्टफोनमध्ये Qualcomm Snapdragon 665 प्रोसेसर देण्यात येणार आहे. हा फोन चारकोल, सायन आणि सँड कलर ऑप्शन्समध्ये देण्यात येणार आहे. Nokia 5.3 मध्ये Android 10 बेस्ड ऑपरेटिंग सिस्टम देण्यात येईल. या फोनची इंटर्नल मेमरी 64GB असेल आणि मायक्रो एसडी कार्डद्वारे ती 512GB पर्यंत वाढविली जाऊ शकते. या फोनमध्ये 4,000mAh ची बॅटरी असेल.

- Advertisement -

Nokia 5.3 मध्ये चार कॅमेरे असतील ज्यामध्ये 13MP चा प्राथमिक कॅमेरा असेल, दुसरा 5MP चा, तर तिसरा 2MP चा तर चौथी 2MP चा मॅक्रो लेन्स देखील देण्यात येणार आहे. या स्मार्टफोनमध्ये बाजूला फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. गुगल असिस्टंट सपोर्टमध्ये देण्यात आला आहे. यात हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप सी कनेक्टिव्हिटी दिली आहे.


हेही वाचा – ‘रिव्हर्स गिअर’सहीत जबरदस्त इंजिनवाली BMW R18 Cruiser बाईक सप्टेंबरमध्ये होणार लाँच

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -