घरटेक-वेकआता नव्या 'इमोजी'तून व्हा व्यक्त

आता नव्या ‘इमोजी’तून व्हा व्यक्त

Subscribe

हल्ली फोनमध्ये मेसेज टाईप करण्यापेक्षा ‘इमोजी ‘ जास्त वापरले जातात. व्हॉटसअप, स्नॅपचॅट, फेसबुक, इन्स्टाग्रामवर सगळीकडेच चॅटिंगमध्ये या इमोजीसची चलती असते. स्माईली फेस, अँग्री फेस, फुड इमोजीस, शॉपिंग इमोजीस असं सगळं काही या इमोजीसमध्ये असतं. या अॅप्सच्या प्रत्येक अपग्रेड व्हर्जनमध्ये तुम्हाला नवीन इमोजी मिळत असतात. आता इमोजी प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता एक, दोन नव्हे तर तब्बल १५७ नवीन इमोजीस येणार आहेत.

कसे असणार नवे इमोजीस?

१५७ नव्या इमोजीस! हा आकडा ऐकून अनेकांना आनंद नक्कीच झाला असेल. १५७ पैकी ६६ इमोजीस या नव्या असणार आहेत, तर उरलेल्या ९१ इमोजी या जुन्या इमोजीसचं अपग्रपेड व्हर्जन असेल. नव्या इमोजीसमध्ये वुझ्झी फेस, हॉट फेस, प्लेंडिंग फेस, कर्ली हेअर, बाल्ड हेड, सुपर व्हिलन अशा इमोजींचा समावेश असणार आहे. मंगळवारी आयफोनची iOS 12 ऑपरेटिंग सिस्टीम लाँच झाली. या दिवशीच नव्या इमोजीस येणार अशी चर्चा होती. आयफोनच्या नव्या iOS नंतर हे इमोजीस अँड्राईड फोनवर देखील उपलब्ध करण्यात आले आहेत.

- Advertisement -
faces emoji
काही लेटेस्ट इमोजी

 

कोणाला मिळणार या नव्या इमोजीस?  

सध्या तरी अँड्राईडच्या लेटेस्ट व्हर्जनवर आणि अॅपलच्या iOS 12 व्हर्जनवर हे नवे स्माईली उपलब्ध असणार आहेत. मायक्रोसॉफ्ट, गुगल, अॅपल, सॅमसंग या मोठ्या ब्रँडसोबत अन्य अँड्राईड फोनमध्ये या इमोजी मिळणार आहेत. सध्या अँड्राईडचा लेटेस्ट व्हर्जन ‘P’ मध्ये हे नवे इमोजीस असणार आहे. पण या इमोजीस नेमक्या कोणत्या अॅपवर उपलब्ध होणार आहेत या बद्दल मात्र अधिक माहिती मिळालेली नाही.

- Advertisement -

तुम्हाला हे माहीत आहे का?

इमोजीच फॅड हे आता सुरू झालं असलं तरी पहिली इमोजी १९९९ साली जपानमध्ये तयार करण्यात आली. शिकेटाका कुरीटा यांनी ही पहिलं इमोजी तयार केली. कुरीटा यांनी आय मोड मोबाईल इंटरनेट प्लॅटफॉर्मसाठी १८० वेगवेगळ्या फेस इमोजी तयार केल्या. मानवी भावना व्यक्त होताना चेहऱ्यावर असलेले भाव त्यांनी या इमोजीतून समोर आणले. हवामानाचा अंदाज सांगताना ज्या चिन्हांचा उपयोग होतो. त्यातून प्रेरणा घेत त्यांनी या इमोजीस तयार केल्या. त्यानंतर इमोजीसमध्ये अनेक बदल करण्यात आले आणि आता नवनव्या इमोजीसची यात भर पडली.

Noto_Emoji_KitKat_263a.svg
जपानमध्ये कुरीटा यांनी तयार केलेली पहिली इमोजी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -