घरटेक-वेकtruecaller वर आता कोणीही शोधू शकणार नाही तुमचा नंबर; सेटिंगमध्ये करा 'हा'...

truecaller वर आता कोणीही शोधू शकणार नाही तुमचा नंबर; सेटिंगमध्ये करा ‘हा’ बदल

Subscribe

Truecaller या ऑनलाईन अॅपचा वापर कॉल आणि मेसेज पाठवण्यासाठी केला जातो. मात्र याचा सर्वाधिक वापर हा अनोखळी मोबाईल नंबरवरून येणारे कॉलची माहिती मिळवण्यासाठी होतो. परंतु Truecaller चा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांचा डेटा हा त्या अॅप डेटा बेसमध्ये सेव्ह होतेय. त्यामुळे कोणताही अनोखळी व्यक्ती जर तुमच्या मोबाईल नंबरची माहिती Truecaller वर सर्च करत असेल तर ती माहिती अगदी सहजरित्या उपलब्ध होते.

Truecaller चा वापर यापूर्वी कधी केला नसेल किंवा करत नसाल तरीही या अॅपवर तुमच्या नंबरची माहिती सेव असते. परंतु काळजी करण्याचे कारण नाही. कारण Truecaller वरुन तुमच्या नंबरची माहिती डिलीट करण्याचा ऑप्शन देखील यात आहे. Truecaller वरून मोबाईल नंबर किंवा माहिती कशी डिलीट करायची याविषयी जाणून घेऊ….

- Advertisement -

जर तुम्ही Truecaller चा वापर करत असाल तर तुम्ही ट्रूकॉलरच्या डेटाबेसमधून आपली माहिती आणि नाव डिलीट करु शकत नाही. परंतु नाव आणि इतर माहिती डिलीट करायची झाल्यास Truecaller वरून तुम्हाला अकाउंट डिअॅक्टिव्हेट करावे लागेल. याचवेळी तुम्ही नाव आणि माहिती डिलीट करु शकता.

१) Truecaller डिअॅटिव्हेट करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम मोबाईलवर ट्रूकॉलर अॅप डाऊनलोड करा.

- Advertisement -

२) यानंतर सेंटिंगमध्ये जाऊन About या ऑप्‍शनवर क्लिक करा.

३) यातील डिअॅक्टिव्हेट ऑप्शनवर क्लिक करा.

४) अकाउंट Deactivate झाल्यानंतर पुढील प्रोसेससाठी truecaller अनलिस्ट पेज (https://www.truecaller.com/unlisting) ओपन करा.

५) यावर आपल्या मोबाईल नंबर कंड्री कोडसह टाका. यानंतर I’m not robot च्या ऑप्‍शनवर क्लिक करा.

६) आता अनलिस्ट नंबरवर क्लिक करा आणि तुमचे नाव आणि डेटा डिलीट करा.

७) Truecaller च्या माहितीनुसार, ही प्रोसेस पूर्ण होण्यासाठी जवळपास २४ तासांचा अवधी लागतो.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -