घरटेक-वेकआता लवकरच येणार इन्टाग्राम शॉपिंग अॅप

आता लवकरच येणार इन्टाग्राम शॉपिंग अॅप

Subscribe

इन्टाग्रामद्वारे आता पर्यंत आपण फोटो, व्हिडिओ आणि स्टोरी शेअर करु शकत होतो. मात्र आता इन्टाग्रामचे एक नवीन अॅप लॉंच होत आहे. हा अॅपद्वारे इन्टाग्राम युजर्स शॉपिंग देखील करु शकतो.

फेसबुक, टविटर, व्हॉट्सअॅप या सोशल मीडियासोबत आजकालच्या तरुणांच्या मोबाईलमध्ये सर्रास आढळणारे अॅप म्हणजे इन्टाग्राम. सध्याची तरुण पिढी इन्टाग्रामची फॅन झाली आहे. बरेच तरुण स्वत:ला व्यक्त होण्यासाठी इन्टाग्रामचा वापर करतात. या इन्टाग्रामद्वारे युजर्स मोठ्या संख्येने फोटो, व्हिडिओ आणि स्टोरी शेअर करतात. मात्र आता इन्टाग्रामचे अजून एक शॉपिंग अॅप लवकरच युजर्सच्या भेटीस येणार आहे. आता इन्टाग्राम युजर्स या अॅपद्वारे शॉपिंग करु शकणार आहेत. इन्टाग्राम लवकरचं आपलं नवीन शॉपिंग अॅप आणण्याच्या तयारीत आहेत. या नव्या अॅपच नाव आयजी शॉपिंग असल्याचे देखील बोले जात आहे. हे नवं अॅप प्रामुख्याने ई-कॉमर्ससाठी असणार आहे.

कस असणार हे अॅप?

‘आयजी शॉपिंग’ असे या नव्या इन्टाग्राम अॅपचे नाव आहे. हे अॅप आयओएस आणि अॅन्ड्रॉईड प्लॅटफॉर्मसाठी तयार करत आहेत. हे अॅप इन्टाग्राम अकाऊंटशी लिंक असणार आहे. त्यामुळे ते इन्टाग्राम अॅप युजर्स पर्यंत पोहोचणार आहे. ‘द वर्ज’च्या रिपोर्टनुसार इन्टाग्राम या नव्या अॅपवर काम करत आहे. ई – कॉमर्समध्ये आपला विस्तार करण्यासाठी बाजारातील आढावा घेत ही कंपनी हे अॅप लॉंच करत आहे. इन्टाग्रामने याबाबत अधिकृत माहिती दिली नसल्याने हे अॅप कधी पर्यंत लॉंच होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

- Advertisement -

इन्टाग्रामचे आयजीटीव्ही फिचर

इन्टाग्रामने या आधी देखील यूट्युबला टक्कर देण्यासाठी एक नव फिचर युजर्सच्या भेटीस आणले आहे. आयजीटीव्ही (IGTV) असे हे फिचर असून यामध्ये एक तासापर्यंत लाईव्ह स्ट्रिमिंग करता येते. हे फिचर यूट्युबला टक्कर देण्यासाठी आणले होते.

या अॅपद्वारे ब्रॅन्डनुसार करु शकता शॉपिंग

इन्टाग्रामच्या या नव्या अॅपद्वारे तुम्हाला हव्या त्या ब्रॅन्डनुसार तुम्ही वस्तू खरेदी करु शकता. हे अॅप लॉंच झाल्यास इन्टाग्रामच्या आर्थिक स्थितीमध्ये देखील वाढ होणार असल्याची ‘द वर्ज’ रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -