घरटेक-वेकDriving Licence साठी आता RTO मध्ये जाण्याची गरज नाही, खासगी कंपन्यांकडून मिळेल...

Driving Licence साठी आता RTO मध्ये जाण्याची गरज नाही, खासगी कंपन्यांकडून मिळेल Licence

Subscribe

Driving Licence मिळवण्यासाठी अर्जदाराला यापूर्वी सतत RTO ऑफिसमध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यामुळे लाईसन्ससाठी अर्ज करुनही तो मिळवण्यासाठी अनेक दिवस जायचे. परंतु आता रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) नवीन मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार आता प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) शिवाय इतर वाहन उत्पादक संघटना, ना-नफा संघटना आणि खासगी कंपन्यांमधूनही ड्रायव्हिंग लायसन्स मिळू शकणार आहे.

ड्राईव्हिंग ट्रेनिंग सेंटर चालवणाऱ्या खासगी कंपन्या किंवा स्वयंसेवी संस्थांमध्ये प्रवेश घेत ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला तेथूनच ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाईल. यासाठी जास्त वेळ लागणार नाही. कारण ड्रायव्हिंगचे प्रशिक्षण पूर्ण होताच तुमच्या हातात ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाईल.

- Advertisement -

अलीकडेच रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक निवेदन जारी केले होते. या निवेदनात खासगी कंपन्या, स्वयंसेवी संस्था, खाजगी संस्था / ऑटोमोबाईल असोसिएशन / ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन / स्वायत्त संस्था / खाजगी वाहन उत्पादक यासारख्या वैध्य संस्था चालक प्रशिक्षण केंद्राच्या मान्यतेसाठी (डीटीसी) अर्ज करू शकतात.

सध्या RTO मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी दररोज शेकडो अर्ज येत असतात. मात्र प्रत्येक व्यक्तीची ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यासाठी बराच वेळ लागतो. कारण DL साठी अर्ज करणाऱ्यांची संख्या खूप जास्त असते. यात तुमची वेळ येण्यासाठी कित्येक महिने जातात. मात्र ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्याची ही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू इच्छिणाऱ्या हजारो अर्जदारांना दिलासा मिळणार आहे. यामुळे आता सामान्य माणसाला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी पुन्हा पुन्हा RTO मध्ये जावे लागणार नाही.

- Advertisement -

Raj Kundra pornography case: राज कुंद्राच्या जामीन अर्जावर १० ऑगस्टला होईल सुनावणी, पोलिसांना नोटीस जारी


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -