घरटेक-वेकआता ट्विटरवर शेड्यूल करता येणार पोस्ट; असं असेल नवं फीचर

आता ट्विटरवर शेड्यूल करता येणार पोस्ट; असं असेल नवं फीचर

Subscribe

नव्या फीचरच्या माध्यमातून आपले यूजर्सची संख्या वाढवण्याचा ट्विटरकडून प्रयत्न

सोशल मीडियातील सर्वाधिक वापरले जाणारे ट्विटरमध्ये दिवसेंदिवस नव-नवीन बदल होत असतात. ट्विटर आपल्या यूजर्ससाठी एक नवीन फीचर लवकरच लाँच करणार आहे. या नव्या फीचर नुसार युजर्सना कोणत्याही ट्विट किंवा पोस्टला शेड्यूल करता येणार आहे. हा पर्याय आतापर्यंत फक्त ट्विट डेकच्या माध्यमातून उपलब्ध होता. मात्र कंपनी आता या नव्या फीचरच्या माध्यमातून आपले यूजर्सची संख्या वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.

ट्विटरचे हे नवे फीचर लवकरच येणार असून कधी या फीचरचा वापर युजर्सना करता येणार हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या फीचर आणण्यामागे कंपनीचा मोठा उद्देश असून जास्तीत जास्त यूजर्सपर्यंत ट्विटरला पोहोचता येणार आहे. सध्या काही युजर्सना या फीचरचा वापर करता येणार आहे. या फीचरमुळे युजर्सना आपली पोस्ट शेड्यूल करता येणार आहे.

- Advertisement -

या महिन्याच्या सुरूवातीला ट्विटरने ‘Topics’ फीचर्सची सुरूवात केली होती. या फीचरच्या माध्यमातून युजर्सना जगभरातील Trending Topics माहित करून घेणं सोपं झाले आहे. या फीचरशिवाय ट्विटर अजून एक फीचर ट्विटर लाँच करणार आहे. त्या नव्या फीचरनुसार युजर्सच्या डायरेक्ट मेसेज इनबॉक्समधून स्पॅम आणि अब्यूजिव मॅसेज आपोआप फिल्टर होणार आहे.


अयोध्या निकालानंतर जगात टॉप ५ ट्रेंडिंगमध्ये होते ‘हे’ हॅशटॅग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -