बाजारात येतेय स्वस्त इलेक्ट्रिक बाईक; एकदा चार्ज करा, १५० किमी फिरा

okinawa oki100 electric bike will launch in march 2021

भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांच्या मागणीत वाढ होत आहे. विशेषत: दुचाकींमध्ये ग्राहक अधिक रस दाखवत आहेत. याच पार्श्वभूमीवर वाहन निर्मात्या कंपन्या इलेक्ट्रिक दुचाकी लाँच करत आहेत. आता आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी वाहन कंपनी ओकिनावा आपली इलेक्ट्रिक बाईक Oki100 लॉन्च करण्याची तयारी करत आहे. ही बाईक १ लाखाच्या आत विकत घेता येईल.

Okinawa Oki100 Electric Bike

देशांतर्गत बाजारात कंपनीने सादर केलेली ही पहिली बाइक असेल. ही बाईक मागील ऑटो एक्सपो दरम्यान प्रथम लाँच केली गेली होती. आता कंपनी पुढील वर्षी मार्च महिन्यात बाईक बाजारात आणू शकते असे वृत्त आहे. ही पूर्णपणे स्वदेशी बाइक असेल, कंपनी स्थानिक घटकांच्या मदतीने हे बनवित आहे.

या बाईकमध्ये कंपनीने 2.5 kW क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी वापरली आहे. त्याचा सर्वोच्च वेग ताशी १०० किलोमीटर आहे. असे सांगितले जात आहे की ही बाइक एकदा चार्ज केल्यानंतर १५० किलोमीटरपर्यंत चालवता येणार आहे. याशिवाय या बाइकमध्ये कंपनी कनेक्टिव्हिटी फीचर्सचाही समावेश करेल, जेणेकरुन ड्रायव्हर जिओ फेन्सिंग, वाहन स्टेट मॉनिटरिंग आणि बॅटरी चेक यासारख्या वैशिष्ट्यांचा वापर करु शकेल.

Oki100 मध्ये कंपनीने नवीन ट्रेंडनुसार एलईडी हेडलॅम्प आणि टेल लॅम्प दिले आहेत. या व्यतिरिक्त कंपनी डिस्क ब्रेक आणि सिंगल चॅनेल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस) ही दोन्ही चाकांवर देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, समोर एक यूएसडी फॉर्क आणि मागील बाजूस मोनोशॉक सस्पेंशन आहे.