देशभरात ओला इलेक्ट्रिक हायपरचार्जर (Hyperchargers) नावाने चार्जिंग नेटवर्क बनवणार आहे. या हायपरचार्जरमुळे ओला ई-स्कूटर १८ मिनिटांत ५० टक्के चार्ज केली जाऊ शकते. ग्राहक याचा ६ महिने मोफत फायदा उचलू शकतात. ओला इलेक्ट्रिकचे संस्थापक आणि सीईओ भाविश अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, येत्या काळात कंपनी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरचा विस्तार करणार आहे. याच वर्षी ओलाने आपली इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस १ आणि ओला एस १ प्रो लाँच केली होती. अलीकडेच कंपनीने देशातील काही शहरांमध्ये याची डिलिव्हरी करण्यास सुरुवात केली आहे.
अग्रवाल यांनी सोशल मीडियावर ही घोषणा करताना सांगितले की, ओला इलेक्ट्रिकचे लक्ष्य भारतात ४ हजारांहून अधिक चार्जिंग पॉईंट इंस्टॉल करण्याचे आहे. हायपरचार्जर पहिल्यांदा बीपीसीएल पेट्रोल पंपसारख्या सार्वजनिक स्थानांवर इंस्टॉल केले जाईल. शिवाय रेजिडेंट्स कॉम्लॅक्समध्ये हे स्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जूनपर्यंत करू शकता मोफत चार्जिंग…
पुढे अग्रवाल म्हणाले की, सर्व शहरांमध्ये हायपरचार्जर रोल आऊट सुरू झाला आहे. दीड महिन्यात पूर्ण देशात ४ हजारांहून अधिक हायपरचार्ज इंस्टॉल केले जाईल. ओलाचे सर्व ग्राहक जूनपर्यंत मोफत चार्जिंगचा लाभ उचलू शकतात. ऑक्टोबरमध्ये ओला इलेक्ट्रिकने आपले पहिले हायपरचार्जर लाँच करण्याची घोषणा केली होती. देशातील ४०० शहरांमध्ये १ लाखांहून अधिक स्थान आणि टचप्वाइंटवर हे स्थापित केले जाईल.
१८ मिनिटांत ५० टक्के होणार स्कूटर चार्ज
ओला इलेक्ट्रिकच्या हायपरचार्जर ई-स्कूटरीची बॅटरी फक्त १८ मिनिटांत ५० टक्क्यांपर्यंत चार्ज करण्यात कॅपेबल आहे. एका वेळेस चार्ज केल्यावर स्कूटर ७५ किमी अर्धा पल्ला गाठू शकेल. दरम्यान ओला प्रत्येक स्कूटरसोबत एक-एक चार्जर देत आहे. ज्यामुळे ग्राहक घरीसुद्धा स्कूटर चार्ज करू शकतात. कंपनीने आपल्या वेबसाईटवर शहराप्रमाणे चार्जिंग नेटवर्कचा उल्लेख केला आहे आणि काही जागेच लोकेशन सांगितले आहे.
हेही वाचा – ऐकावं ते नवलच! आता AI मशीन घेणार आरोपींचा शोध अन् ठोठावणार शिक्षा