Sunday, September 26, 2021
27 C
Mumbai
घर टेक-वेक Ola Electric Scooter: आजपासून खरेदी सुरू; जाणून घ्या बुकिंगसह, किंमत आणि फिचर्स

Ola Electric Scooter: आजपासून खरेदी सुरू; जाणून घ्या बुकिंगसह, किंमत आणि फिचर्स

Related Story

- Advertisement -

ओलाने आपल्या इलेक्ट्रिक स्कूटर S1 ची विक्री आजपासून म्हणजेच 8 सप्टेंबरपासून सुरू केली आहे. World EV Day च्या पूर्वसंध्येला S1 स्कूटरची विक्री सुरू करण्यात आली आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटर प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 15 ऑगस्ट रोजी भारतात लॉन्च करण्यात आली आहे. भारतात, हे S1 आणि S1 Pro या दोन व्हेरिएंट्समध्ये लॉन्च करण्यात आले आहे. आता आजपासून ओला S1 इलेक्ट्रिक स्कूटरचे दोन्ही व्हेरिएंट्स खरेदीसाठी उपलब्ध असणार आहेत. ओलाच्या पहिल्या ई-स्कूटरचे बुकिंग जुलैपासून सुरू झाले आहे, ज्याला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ओला इलेक्ट्रिक स्कूटरचे पहिल्या 24 तासात 1 लाख बुकिंग करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. ग्राहकांना या इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी ऑनलाईन पद्धतीने देखील करता येणार आहे.

अशी आहे किंमत

ओला इलेक्ट्रिकने या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती आधीच जाहीर केल्या आहेत. ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या S1 व्हेरिएंटची शोरूम किंमत 99,999 रुपये आहे, तर S1 Pro व्हेरिएंटची शोरूम किंमत 1,29,999 रुपये अशी आहे. FAME II सबसिडी आणि राज्य सबसिडी वगळता या शोरूम किंमती आहेत. याचा अर्थ तुम्ही ज्या राज्यात ई-स्कूटर खरेदी करता त्यानुसार हे दर बदलू शकतात. दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थान या राज्यात वेगवेगळी किंमत ठेवण्यात आली आहे. सर्वात स्वस्त किंमत ही गुजरातमध्ये आहे. तर सर्वाधिक किंमत महाराष्ट्रात 94 हजार 999 रूपये इतकी आहे. चार शहरे वगळून इतरत्र मात्र किंमत ही 99 हजार 999रूपये इतकी ठेवण्यात आली आहे. तर अतिरिक्त स्पेसिफिकेशनच्या वेरीयंटमध्ये या स्कुटरला Ola S1 Pro साठीची किंमत 1 लाख 29 हजार 999 रूपये इतकी ठेवण्यात आली आहे.

अशी करता येणार बुक

- Advertisement -

ओला इलेक्ट्रिक स्कूटर डीलरशिपवर उपलब्ध नसल्याने ती ग्राहक ऑनलाइन खरेदी करू शकता. हे बुक करण्यासाठी, खरेदीदारांना 499 रुपयांची टोकन रक्कम भरावी लागणार आहे. ही स्कूटर 8 सप्टेंबरपासून म्हणजेच आजपासून खरेदी करता येणार आहे, त्यामुळे ग्राहक शिल्लक रक्कम भरून आणि रंग निवडून खरेदी प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

जाणून घ्या फिचर्स

  • ओला इलेक्ट्रिक स्कुटर ही क्रुस कंट्रोलच्या माध्यमातून वेगावर नियंत्रण ठेवते
  • या स्कुटरला बिल्ट इन स्पिकर्सदेखील आहेत. या स्पिकर्सचा वापर हा गाण्यांसोबतच फोन कॉल्ससाठीही करणे होणार शक्य
  • या स्कुटरला एनेलॉग स्पिडोमीटर एवजी मोठी टच स्क्रिन देण्यात आली आहे असून त्यामध्ये MovaOS या सिस्टिमचा वापर

इंधन दरवाढीचा निषेध; पंतप्रधान मोदींना भेट दिल्या गोवऱ्या आणि मातीच्या चुली!

- Advertisement -