घरटेक-वेकआयफोन द्या वन प्लस घ्या, वन प्लसची आयफोनला टक्कर

आयफोन द्या वन प्लस घ्या, वन प्लसची आयफोनला टक्कर

Subscribe

आयफोन युजर्स अनेकदा जुना आयफोन देऊन नवीन मॉडेल घेतात. पण वन प्लस ६ टी या नव्या फोनकडे लोकांना अधिक आकर्षित करण्यासाठी जुना आयफोन द्या आणि नवा वन प्लस टी फोन घ्या.

आयफोन युजर्सला दुसरा कोणताही फोन वापरायला सांगितला तर ते दुसरा फोन वापरायला नकारच देतात. पण सध्या IOSला टक्कर देणारे इतके चांगले ANDROID फोन्स आले आहेत की, अॅपलपेक्षा अन्य फोन्सला अनेकांची पसंती मिळत आहे. वन प्लस हा सध्या ANDROIDमधील उत्तम फोन मानला जातो. या कंपनीचा नवा फोन आला आणि तरुणांनी त्याला उत्तम प्रतिसाद देखील दिला. म्हणून फोनमध्ये नंबर वन असलेल्या अॅपल कंपनीला चॅलेंज देत लोकांना त्यांच्या फोनकडे वळवण्यासाठी एक ऑफर ही ठेवली.

आयफोन द्या, वन प्लस घ्या

आयफोन युजर्स अनेकदा जुना आयफोन देऊन नवीन मॉडेल घेतात. पण वन प्लस ६ टी या नव्या फोनकडे लोकांना अधिक आकर्षित करण्यासाठी जुना आयफोन द्या आणि नवा वन प्लस टी फोन घ्या,अशी ऑफर्स ठेवली आहे.  ऑनलाईन हा फोन विक्रीसाठी ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे आयफोनच्या एक्सचेंजसोबत ३ हजार रुपयांची अधिक सूट देखील या फोनवर देण्यात आली. ३० नोव्हेंबरपासून ही ऑफर सुरु झाली आहे. फार कमी वेळासाठी ठेवण्यात आली आहे. ऑनलाईनसोबत अनेक स्टोअर्समध्ये ही ऑफर ठेवण्यात आली आहे. आयफोन युजर्सला आकर्षित करण्यासाठी ही ऑफर ठेवण्यात आल्याचे देखील कळत आहे.

- Advertisement -

पाहा वनप्लस ६टी या फोनची वैशिष्टये

या फोनची वैशिष्टये पाहता हा फोन आयफोनला टक्कर देऊ शकेल का? चार वर्षांपूर्वी आलेला वन प्लस आयफोनची जागा घेईल का? हे बघणं महत्वाचे ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -