घरटेक-वेकवन प्लसची २०२० पर्यंत होणार शंभर एक्सपिरियन्स सेंटर

वन प्लसची २०२० पर्यंत होणार शंभर एक्सपिरियन्स सेंटर

Subscribe

भारतीय स्मार्टफोन बाजारपेठेतील पहिल्या क्रमांकाचा ब्रँड असलेल्या वन प्लसने २०२० पर्यंत देशभरातील ५० शहरांमध्ये १०० एक्सपिरियन्स सेंटर सुरू करण्याचा निर्धार केला आहे. प्रारंभीच्या काळात केवळ ऑनलाइन उपलब्ध असलेल्या वन प्लसने आता ऑफलाइन विक्रीसाठी देशभरात सुरू केलेल्या प्रयत्नांअंतर्गत ही सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. यात महानगरांखेरीज अन्य शहरांवरही मोठ्या प्रमाणात भर देण्यात येईल. आजमितीला वन प्लसची देशभरात ३० स्टोअर्स असून ६० हून अधिक सर्व्हिस सेंटर आणि दोन हजारांहून अधिक दुकानांमध्ये वन प्लस विक्रीसाठी उपलब्ध आहे.

हेही वाचा – आयफोन द्या वन प्लस घ्या, वन प्लसची आयफोनला टक्कर

- Advertisement -

मुंबईत नवे एक्सपिरियन्स सेंटर

जगभरातील आघाडीचा स्मार्टफोन ब्रॅंड असणाऱ्या ‘वन प्लस’ने आता रिटेल विक्री क्षेत्रामार्फतही मोबाइल विक्रीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून मुंबईतील दुसऱ्या एक्सपिरियन्स सेंटरचे उद्घाटन मंगळवारी मुंबईतील हाय स्ट्रीट फिनिक्स येथे करण्यात आले. पुढील दोन दिवस या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये धमाल गेम्स आणि कार्यक्रमांचे आयोजन करून या स्टोअरचे उद्घाटन साजरे करण्यात येणार आहे. या निमित्ताने ग्राहकांना अनेक नवनवीन सवलतींचा धडाकाही वन प्लसने लावला आहे.


हेही वाचा – ‘वनप्लस ७टी’ सिरीज आणि ‘वनप्लस टीव्ही’चे ‘हे’ आहेत फिचर्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -