OnePlus6T भारतात लाँच, पाहा जबरदस्त फिचर्स

येत्या २ नोव्हेंबरपासून या फोनच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. मात्र, अॅमेझॉनच्या प्राईम मेंबर्ससाठी १ नोव्हेंबरपासूनच विक्रीला सुरुवात होणार आहे.

OnePlus6T भारतात लाँच
वन प्लस कंपनीचा OnePlus6T हा फोन अखेर भारतात विक्रीसाठी लाँच झाला आहे. कंपनीने OnePlus6T या फोनची घोषणा केल्यापासूनच गॅजेटप्रेमी आणि OnePlus ब्रँडचे चाहते त्याच्या प्रतिक्षेत होते. मात्र, आता ही प्रतिक्षा संपली असून भारतातील ग्राहकही हा फोन खरेदी करु शकणार आहेत. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या एका भव्य कार्यक्रमात OnePlus6T हा नवाकोरा फोन लाँच करण्यात आला. २०१४ साली भारतामध्ये OnePlus चं पहिलं मॉडेल लाँच करण्यात आलं होता. तेव्हापासून आतापर्यंत भारतीयांचा वन प्लसला नेमहीच चांगली प्रतिसाद मिळाला आहे. OnePlus6T हा फोन सध्या फक्त Amazon वेबसाईटवरच विक्रीसाठी उपलब्ध आहे. येत्या २ नोव्हेंबरपासून या फोनच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. मात्र, अॅमेझॉनच्या प्राईम मेंबर्ससाठी १ नोव्हेंबरपासूनच विक्रीला सुरुवात होणार आहे. OnePlus ने रिलायन्स जिओसोबत भागीदारी केली असून, फोनच्या खरेदीवर कॅशबॅकची ऑफर देण्यात आली आहे.

OnePlus6T मॉडेल्सची किंमत

 • ६ GB रॅम आणि १२८ GB मेमरी – ३७,९९९ रुपये
 • ८ GB रॅम आणि १२८ GB मेमरी – ४१,९९ रुपये
 • ८ जीबी रॅम आणि २५६ GB मेमरी – ४५,९९९ रुपये

OnePlus6T चे फिचर्स
 • फिंगरप्रिंट स्कॅनर
 • मिडनाईट ब्लॅक आणि मिरर ब्लॅक कलरमध्ये उपलब्ध
 • गोरिल्ला ग्लासची सुरक्षा
 • ड्युएल सीम सपोर्ट
 • ३७०० mAh क्षमतेची बॅटरी
 • ड्युएल एलईडी फ्लॅश
 • १६ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा, २० मेगापिक्सल सेकंडरी रिअर कॅमेरा
 • IMX376K सेंसरसह १६ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा
 • पोट्रेट शॉट्ससाठी स्टुडिओ लायटिंग मोड
 • क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ लेटेस्ट प्रोसेसर
 • वनप्लस ६ टीएक्सीलेरोमीटर, अॅम्बियंट लाईट सेंसर, प्रॉक्सिमिटी सेंसर