घरटेक-वेकभारतात OnePlus 8T स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमतीसह स्पेशल फीचर्स

भारतात OnePlus 8T स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या किंमतीसह स्पेशल फीचर्स

Subscribe

जाणून घ्या, OnePlus 8T चे स्पेसिफिकेशन

OnePlus चा नवा OnePlus 8T 5G स्मार्टफोन लाँच नुकताच लाँच करण्यात आला आहे. कंपनीने या फोनला एका व्हर्च्यूअल इव्हेंटमध्ये या फोनला लाँच केले असून हा वनप्लसचा पहिला स्मार्टफोन आहे. ज्यात 65W Warp Charge टेक्नोलॉजी सोबत ग्राहकांना हा फोन उपलब्ध होणार आहे. या फोनला दोन व्हेरियंट 8 जीबी प्लस 128 जीबी आणि 12 जीबी प्लस 156 जीबी स्टोरेजमध्ये लाँच करण्यात आले आहे. यात 8 जीबी रॅमच्या फओनची किंमत 42 हजार 999 रुपये तर 12 जीबी रॅमच्या फोनची किंमत 45 हजार 999 रुपये आहे. फोनचा सेल 17 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे.

65W Warp Charge सपोर्ट

फोनमध्ये अँड्रॉयड 11 आउट ऑफ द बॉक्स वर बेस्ड Oxygen OS 11 मिळणार आहे. फोनमध्ये ऑल्वेज ऑन डिस्प्ले, बिटमोजी, लाइव वॉलपेपर आणि ग्रुप जेन मोड यासारखे फीचर्स दिले आहेत. फोनला पॉवर देण्यासाठी यात 4500mAh ची बॅटरी दिली आहे. हा फोन 65W Warp Charge टेक्नोलॉजीला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, १५ मिनिटात चार्ज केलेल्या फोनची बॅटरी दिवसभर चालते.

OnePlus 8T चे असे आहेत स्पेसिफिकेशन

  • फोनमध्ये 1080×2400 पिक्सल रेजॉलूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट सोबत 6.55 इंचाचा एचडी प्लस फ्लूइड डिस्प्ले दिला आहे.
  • हा फोन 12 जीबी रॅम पर्यंत आणि 256 जीबी स्टोरेज पर्यंत लाँच केला आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 865 चिपसेट दिला आहे.
  • फोटोग्राफीसाठी यात चार रियर कॅमेरे दिले आहेत. 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर सोबत एक 16 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, एक 5 मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि एक 2 मेगापिक्सलचा मोनोक्रॉम सेन्सर दिला आहे.
  • या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा स्वतःहून नाइट मोडवर स्विच करतो. सेल्फीसाठी या फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे.

फेस्टिव्हल सेलच्या पूर्वीच OnePlus Nord चा नवा वेरिएन्ट होणार लाँच; जाणून घ्या किंमत
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -