घरटेक-वेकउद्या लाँच होणार Oppo F17 आणि F17 Pro; जाणून घ्या फीचर्स

उद्या लाँच होणार Oppo F17 आणि F17 Pro; जाणून घ्या फीचर्स

Subscribe

भारतातील लोक ज्या Oppo F17 आणि F17 Pro ची आतुरतेने वाट पाहत होते, त्याची प्रतीक्षा २ सप्टेंबरला म्हणजे उद्या संपणार आहे. उद्या २ सप्टेंबर रोजी कंपनी आपल्या सर्वात प्रलंबीत Oppo F17 आणि F17 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्याचबरोबर ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टने Oppo F17 मालिकेसाठी एक मायक्रो वेबसाइटही जाहीर केली असून यामध्ये लाँचिंग तारखेसह आगामी स्मार्टफोनची काही वैशिष्ट्यांचा खुलासा केला आहे.

फ्लिपकार्टवर Oppo F17 Pro शी संबंधित माहिती देण्यात आली आहे, त्यानुसार हा स्मार्टफोन २ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता लाँच होणार आहे. फ्लिपकार्टवर Oppo F17 Pro चा २० सेकंदाचा व्हिडीओदेखील शेअर करण्यात आला असून त्यात त्याचा कॅमेरा आणि डिझाइन दाखवली आहे. हा कंपनीचा अल्ट्रा स्लीक मोबाईल असेल आणि या फोनचे वजन केवळ १६४ ग्रॅम आहे. इतर वैशिष्ट्यांविषयी बोलायचं झालं तर Oppo F17 Pro मध्ये एकूण ६ एआय कॅमेरे देण्यात आले आहेत. यापैकी ४ रियर कॅमेरे आणि २ सेल्फी कॅमेरे आहेत.

- Advertisement -

या फोनमध्ये MediaTek Helio P95 प्रोसेसर देण्यात आला आहे. 8GB + 128GB या व्हेरिएंटमध्ये हा फोन असणार आहे. 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज वाढवता येणार आहे. 6.43 इंचाचा 409 PPI Super AMOLED डिस्पेला देण्यात आला आहे. 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -