घरटेक-वेकभारतात Oppo F17, F17 Pro आज होणार लाँच

भारतात Oppo F17, F17 Pro आज होणार लाँच

Subscribe

Oppo F17 आणि Oppo F17 Proची वाट पाहणाऱ्या ग्राहकांची प्रतीक्षा संपणार

Oppo आज भारतात Oppo F17 आणि Oppo F17 Pro हे दोन स्मार्ट फोन लाँच करणार असून कंपनी डिजिटल इव्हेंट आयोजित करुन हे स्मार्टफोन बाजारात आणणार आहे. त्यामुळे संध्याकाळी ७ वाजता आतुरतेने वाट पाहणाऱ्या ग्राहकांची प्रतीक्षा संपणार आहे. Oppoच्या सोशल मीडिया आणि यूट्यूबवर हा कार्यक्रम थेट प्रसिद्ध केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. कंपनीने Oppo F17 सीरीज़चा टीझर काही काळापूर्वी जारी केला होता.

2020 चा सर्वात स्लीम फोन म्हणून कंपनी Oppo F17 Pro ला बाजारात विक्रीस आणत आहे. हा फोन स्लीक असणार, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने काही माहिती शेअर केली असून त्यांच्या मते, हा फोनला 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असणार आहे.

- Advertisement -

Oppo च्या मते, या Oppo F17 Pro मध्ये एकूण सहा कॅमेरे असतील. सेल्फीसाठी दोन फ्रंट कॅमेरे तर रियर पॅनेलवर चार कॅमेरे देण्यात येणार आहेत. या स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा सुपर अमोलेड डिस्प्ले दिला जाणार आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Helio P95 प्रोसेसर दिला जाऊ शकतो. हेडफोन जॅक, सी टाइप यूएसबी देखील दिले जाण्याची शक्यता आहे. प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सेलचा असल्याचे कंपनीकडून सांगितले जात आहे.

Oppo F17 च्या संभाव्य स्पेसिफिकेशन्सबद्दल सांगायचे तर या स्मार्टफोनमध्ये 6.44 इंचाचा फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो. 8GB + 128GB या व्हेरिएंटमध्ये हा फोन असणार आहे. 256GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज वाढवता येणार आहे. 6.43 इंचाचा 409 PPI Super AMOLED डिस्पेला देण्यात आला आहे. 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

- Advertisement -

Oppo F17 Pro ची किंमत किती असणार हे मात्र लाँच झाल्यानंतरच स्पष्ट होईल. परंतु या फोनची किंमत केवळ 25,000 रुपयांच्या आतच असावी, अशी अपेक्षा करता येऊ शकते.


Realme ने आणलाय जगातला सर्वात स्वस्त 5G फोन
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -